सार
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आपल्या निवडणूक ओळखपत्रात चूक झाली असेल तर काळजी करू नका कारण आपण घरी बसल्या बसल्या ऑनलाईन दुरुस्ती करून घेऊ शकता.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी जोरात सुरु केली आहे. निवडणुकांची तयारी एका बाजूला होत असताना मतदारांनी जागरूक होणे गरजेचं आहे. ज्या लोकांकडे मतदान कार्ड नाही त्यांना ऑनलाईन मतदान कार्ड मिळू शकते. तसेच ज्या मतदारांच्या मतदान कार्डमध्ये चुका झाल्या आहेत, त्या दुरुस्त ऑनलाईन पद्धतीने केल्या जाऊ शकतात.
मतदान कार्डात दुरुस्ती करणे सोपे -
मतदान करताना सर्वात आधी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. आपल्या मतदान कार्डात नाव, पत्ता किंवा फोटोवरून काही चुकीचे प्रिंट होऊन आले असेल तर चिंता करायची गरज नाही. यासाठी आपल्याला सरकार ऑफिसचे चक्कर घालावे लागणार नाहीत. यासाठी आपल्याला काय करावे लागेल, हे सर्वात आधी जाणून घेऊयात.
- सर्व प्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल www.nvps वर लॉग इन करा.
- तुमचा मतदारसंघ बदलला असेल तर तुम्हाला ऑनलाइन फॉर्म-6 भरावा लागेल.
- तुमचा पत्ता बदलला असेल तर तुम्हाला Form-8A वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, राज्य, मतदारसंघ आणि पत्ता इत्यादी भरावे लागतील.
- त्यानंतर फॉर्ममध्ये ईमेल ॲड्रेस आणि मोबाइल नंबर इत्यादी टाकावे लागतील.
- येथे तुम्हाला छायाचित्र, पत्ता पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- यानंतर घोषणा पर्याय भरा आणि कॅप्चा देखील भरा.
- त्यानंतर तुम्ही भरलेल्या सर्व माहितीची पडताळणी करून ती सबमिट करा.
मतदार कार्डमध्ये नाव आणि जन्मतारीख दुरुस्ती
जर तुम्हाला मतदार ओळखपत्रातील नाव आणि जन्मतारीख बदलायची असेल तर तुम्हाला फॉर्म 8A वर जावे लागेल आणि त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या नावात आणि जन्मतारखेत दुरुस्त्या करू शकता.
आणखी वाचा -
Lok Sabha Election 2024 : देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला
लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील जनतेला खुले पत्र, कलम 370 ते GST च्या मुद्द्यांवर टाकलाय प्रकाश