सार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात असून सध्या त्यांचा प्रकृती बाबत डॉक्टरांनी धक्कादायक बाब सांगितली आहे. जाणून घ्या काय म्हणाले डॉक्टर अरविंद केजरीवाल यांच्या तब्बेतीबाबत.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तब्बेतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अरविंद केजरीवाल यांचे 4.5 किलो वजन घटले आहे. त्यांचे वजन कमी होत असल्याने प्रकृती चिंताजनक आहे.तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांचे लक्षणीय वजन कमी झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांना योग्य तपासणी आणि ट्रीटमेंटची गरज असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे. तथापि, तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी हे दावे नाकारले आहेत. त्यांचे वजन 55 किलोचा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
दारू घोटाळ्या प्रकरणी न्यायालयीन तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना 21 मार्च रोजी कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.
तिहारच्या तुरुंगातील तुरुंग क्रमांक 2 मधील 14X8 फूट कोठडीत त्यांना ठेवण्यात आले आहे. केजरीवाल यांना मधुमेह असल्याने रक्तातील साखरेच्या प्रमाणात मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. एक दिवस हे प्रमाण 50 च्या खाली गेल्याचे देखील सांगितले जात आहे.त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी त्यांना औषधे दिली जात आहेत.
केजरीवाल यांच्या साखरेची पातळी सामान्य होईपर्यंत घरचे जेवण खाण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी दुपारचे आणि रात्रीचे जेवण घरून आणले जाणार आहे. केजरीवाल हे आज सकाळी त्यांच्या सेलमध्ये ध्यानधारणा करत होते. सकाळी त्यांना चहा आणि बिस्किटे देण्यात आली. सेलच्या बाहेर दोन जेल वॉर्डर आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कारागृह प्रशासन सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय सेलच्या बाहेर क्यूआरटी टीमही तैनात करण्यात आली आहे. केजरीवाल यांनी अलीकडेच त्यांची पत्नी सुनीता यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आणि त्यांच्या वकिलाशी प्रत्यक्ष भेट घेतली.
आणखी वाचा :
FASTag:आता एका वाहनासाठी एकच फास्ट टॅग, देशभरात 'एक वाहन एकच फास्टॅग'