सार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. ते जवळपास 46 पर्यंत खाली आल्याचे सांगण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या शरीरातील साखर इतक्या प्रमाणात खाली आल्याने ते धोकादायक ठरू शकते असे डॉक्टरांनी म्हटले आहे. 

ईडीने अरविंद केजरीवाल यांना दारू प्रकरणातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती दिली. त्यांच्या साखरेची पातळी कमी होत असूनही त्यांचा निर्धार पक्का असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आणि ईडी कारवाईच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, या याचिकेवरील सुनावणी आज दुपारी चार वाजता होणार आहे. केजरीवाल यांच्या बाजूने युक्तिवाद करताना त्यांच्या वकिलाने सांगितले की, ईडीने केलेली अटक बेकायदेशीर आहे आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचनेचे उल्लंघन आहे. केजरीवाल यांच्या वकिलांनी त्यांच्या तात्काळ सुटकेसाठी दबाव आणला परंतु ईडीने उत्तर दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला.
आणखी वाचा - 
माझे पती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 28 मार्चला पुराव्यासह सत्य उघड करतील, सुनीता केजरीवाल यांनी केला दावा
UK : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीदरम्यान भारतीय विद्यार्थी सत्यम सुराणाच्या विरोधात द्वेश मोहीम सुरू, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर