पुण्यात ट्राफिक हवालदाराला पेट्रोल टाकून जाळण्याचा केला प्रयत्न, नेमकं अस झालं तरी काय?

| Published : Jul 06 2024, 12:36 PM IST

Supriya Sule

सार

पुणे शहरात कॉन्स्टेबलला जाळण्याचा प्रयत्न केला असून या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले असून ते व्हायरल झाले आहे. 

पुणे शहरात सध्याच्या घडीला काय चालले आहे ते समजत नाही. पोर्शे कार अपघात, पबमध्ये ड्रग्स या घटनांमुळे पुणे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या परत एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी केलेलं ट्विट परत एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी केलेले ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

सुप्रिया सुळे यांनी केलेलं ट्विट - 
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. पुण्यातील प्रचंड वर्दळीच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या जवळच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ड्रंक ॲंड ड्राईव्ह ची कारवाई सुरु असताना ही घटना घडली. हे कृत्य अतिशय संतापजनक आहे. थेट पोलीसांवर हात टाके पर्यंत गुन्हेगार या राज्यात निर्ढावले आहेत. एकिकडे अशा घटनांमुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होत असून दुसरीकडे सर्वसामान्य माणूस भीतीच्या सावटाखाली जगतोय ही सत्य परिस्थिती आहे. गृहमंत्री महोदय, पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पोलीसांवरील हल्ला ही अतिशय गंभीर बाब आहे. याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण द्यावेत.

नेमकं झालं तरी काय - 
सध्या पुणे शहरात एक नवीन घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री फरासखाना येथील पोलीस स्टेशनच्या जवळ ही घटना घडली आहे. येथे ड्रंक आणि ड्राईव्हच्या बाबतीत एक घटना घडली आहे. येथे संजय याला पकडल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. याचवेळी महिला कॉन्स्टेबलवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. या एका घटनेने सगळं वातावरण ढवळून निघालं आहे.