IAF Plane Crash : आसामच्या जोहराट येथे भारतीय वायूसेनेचे विमान कोसळलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एअरबेसमध्ये लँडिग करताना सदर दुर्घटना घडली आहे.
IAF Plane Crash : आसामजवळील जोरहाट एअरबेसमध्ये शनिवारी (13 जून) भारतीय वायूसेनेचे एक AN-32 ट्रान्सपोर्ट विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. लँडिंग झाल्यानंतर लगेच विमानामध्ये अचानक आग लागल्याने सदर दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या रिपोर्ट्सनुसार, विमानाने एअरबेसच्या रनवेवर सुरक्षित लँडिंग केले होते. पण त्यानंतर लगेच आगीचे लोट विमानातून येऊ लागले. आग लागल्याने एरअबेसमध्ये गदारोळ निर्माण झाला आणि वायूसैन्याकडून आपत्कालीन यूनिटला मदतीसाठी संपर्क साधण्यात आला.

दुर्घटनेची माहिती मिळताच, एअरबेसच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासह विमानातील चार चालक दल आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन बचावकार्य सुरू करण्यात आले. वायूसैन्याच्या अधिकाऱ्यांकडून विमानातील लोकांची स्थिती आणि दुर्घटनेबद्दल अधिकृत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.
वायूसेनेच्या एएन-32 विमानाचा अपघात झाल्यानंतर वायूसेनने एक विधान जारी करत म्हटले आहे की, "जोहराटमध्ये आज IAF च्या एका AN-32 विमानाचा अपघात झाला आहे. अधिक माहिती मिळाल्यावर पुढील अपडेट दिले जाईल." अधिकाऱ्यांकडून विमानाला नक्की आग का लागली याबद्दल तपास केला जात आहे.
AN-32 एअरक्राफ्टचा आतापर्यंत 22 वेळा अपघात
वर्ष 1986 पासून ते आतापर्यंत AN-32 विमानाचा भारतात 22 वेळा अपघात झाला आहे. यामध्ये अलीकडेच वर्ष 2025 मध्ये अपघात झाला होता. दुर्घटनांच्या इतिहास असला तरीही AN-32 भारतीय वायूसेनेसाठी सर्वाधिक वापरले जाणारे ट्रान्सपोर्ट विमानांपैकी एक आहे.
याच वर्षात मार्च महिन्यात भारतीय वासूयेनेचे एक सुखोई-30एमकेआय लढाऊ विमान नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाणावेळी क्रॅश झाले होते. या दुर्घटनेत स्क्वॉड्रन प्रमुख अनुज आणि फ्लाइट लेफ्टिनंट पुरवेश दुरागकर यांचा मृत्यू झाला होता. विमानाने जोरहाट एअरबेस येथून उड्डाण केले होता. सदर दुर्घटना आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील बोकाजन सब-डिव्हिजन येथील इंगलोंग एकोपी पहाडाच्या क्षेत्राजवळ झाली होती.


