PM Modi Europe Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोवाकियासह जी-7 शिखर समिटसाठी युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनसह काही महत्वाच्या नेतेमंडळींची भेट घेणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
PM Modi Europe Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून युरोपच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा येत्या 18 जूनपर्यंत असणार असून यादरम्यान पंतप्रधान मोदी फ्रान्स आणि स्लोवाकियाचा दौरा करणार आहेत. येथे जी-7 शिखर समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या दौऱ्यामधील सर्वाधिक मोठी गोष्ट अशी की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पीएम मोदी यांची भेट होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या दीड वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील नात्यात दूरावा आल्याचे दिसून आले आहे. अशातच पीएम मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहेच. पण परराष्ट्र मंत्रालयानुसार, पीएम मोदी यांचा हा दौरा भारत आणि युरोपीय संघाच्या नात्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे.याशिवाय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार आहेत. यानंतर पीएम मोदी स्लोवाकियाचा ऐतिहासिक दौऱ्यावर जाणार आहेत.
सर्वप्रथम फ्रान्सच्या नीस शहराला देणार भेट
दौऱ्यापूर्वी पीएम मोदी 13 जूनला फ्रान्सच्या नीस शहराला भेट देणार आहेत. याच्या दुसऱ्या दिवशी (14 जून) पीएम मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासोबत बैठक करणार आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि फ्रान्सच्या संबंधांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. याशिवाय पीएम मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन 'भारत इनोवेट्स' कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. यामुळे भारताच्या व्यावसाय क्षेत्राला फार मोठा हातभार लागणार आहे.
स्लोवाकियाच्या दौऱ्यामुळे होणार फायदा?
फ्रान्सनंतर पीएम मोदी 14 ते 16 जूनपर्यत स्लोवाकियाच्या राजकीय दौऱ्यावर असणार आहेत. वर्ष 1993 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एखादा भारतीय पंतप्रधान स्लोवाकियाचा दौरा करणार आहे. पीएम मोदी स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. याशिवाय राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांची देखील भेट घेणार आहेत. या ऐतिहासिक दौऱ्यावेळी दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूकीवर खास चर्चा होणार आहे. मुख्यत्वे ऑटोमोबाइल आणि रेल्वे सेक्टरला अधिक चालना देण्याच्या उद्देशाने काही निर्णय घेतले जाऊ शकतात.
जी-7 शिखर समिटमध्ये पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार?
दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात पीएम मोदी 16 आणि 17 जूनला फ्रान्सच्या एवियामध्ये आयोजित करण्यात आलेल्यी जी-7 शिखर समिटमध्ये सहभागी होणार आहे. या समिटकडे संपूर्ण जगाचे लक्ष पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीकडे लागले आहे. जवळजवळ गेल्या दीड वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेच्या नातेसंबंधात दूरावा आल्याचे दिसून आले आहे. यामुळे ट्रम्प आणि पीएम मोदी यांची भेट होणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


