Monsoon Update : मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्ट सिस्टिम(MMCFS) यांच्या अनुमानानुसार, जून ते सप्टेंबरदरम्यान अल निनोची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. याशिवाय ही स्थिती संपूर्ण मान्सूनपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या वर्षात किती पाऊस होणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Monsoon Update : यंदा देशाच्या दक्षिण-पश्चिम मान्सूनदरम्यान पावसासंबंधित एक मोठी चिंता समोर आली आहे. अर्थ सिस्टिम सायन्स ऑर्गेनाइझेशन (ESSO) आणि IMD याच्या ताज्या अंदाजानुसार, भूममध्यरेखीय प्रशांत महासागरात सध्या अल निनोची स्थिती सक्रिय असून मॉन्सूनदरम्यान ती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्यानुसार, प्रशांत महासागर आणि हवामान या दोन्ही स्तरावर आता अल निनोचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. समुद्र तटाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा अधिक झाले असून समुद्राखाली पाणी गरम झाले आहे.
अल नीनो नक्की काय आहे?
अल निनो एक जागतिक जलवायू पॅटर्न असून ही स्थिती अशावेळी निर्माण होते जेव्हा भूमध्यरेखीय प्रशांत महासागरमध्ये समुद्र तटाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा अधिक गरम होते. यामुळे हवेचा पॅटर्न आणि वातावरणात दबाव निर्माण होत संपूर्ण जगभरातील मान्सूवर त्याचा परिणाम होते.
सामान्य दिवसांमध्ये वाहणारा वारा कमी होतो तेव्हा गरम पाणी सर्वसामान्यपणे प्रशांत महासागराच्या दिशेने पुढे सरकते आणि पूर्व प्रशांत महासागरच्या दिशेने पसरू लागते. यामुळे जगातिक स्तरावरील वातावरणात बदल होतो. काहीवेळेस मुसळधार पाऊस पडण्यासह पुर तर काही येथे दुष्काळाची स्थिती निर्माण होते.
महासागरामध्ये वेगाने वाढले तापमान
आयएमडीच्या बुलेटीननुसार, मे महिन्यामध्ये मध्य आणि पूर्व भूमध्यरेखीय प्रशांत महासागरच्या समुद्र तटाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. असाच बदल पश्चिम प्रशांत महासागर, सागरी खंड आणि महासागराच्या दोन्ही गोलार्धाच्या भागात पाहायला मिळाला. चिंतेची बाब अशी की, हिंद महासागरचे दोन्ही हिस्से अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीच्या सामान्य तापमानापेक्षा अधिक गरम झाले आहेत. एप्रिलच्या तुलनेत प्रशांत आणि हिंद महासागरच्या मोठ्या हिस्स्यामध्ये तापमान फार वाढले गेले असल्याने अल निनोची स्थिती मान्सूनवेळी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ENSO वादळाची स्थिती
गेल्या वर्षात इंसो वादळामध्ये फार चढउतार दिसून आला आहे. वर्ष 2025 च्या मध्यात स्थिती पूर्णपणे सामान्य होती. ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत वातावरणात अल निनोची स्थिती होती. मार्च 2026 मध्ये स्थिती पुन्हा एकदा सामान्य झाली. जून 2026 मध्ये प्रशांत महासागराचे तापमान आता अल निनोच्या स्तरापेक्षा अधिक झाले आहे.
मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्ट सिस्टिम (MMCFS) च्या अनुमानानुसार, जून ते सप्टेंबरदरम्यान अल निनोची स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.याचा संपूर्ण परिणाम मान्सूवर होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
याशिवाय हवामान खात्यानुसार, जून ते ऑगस्टदरम्यान मध्य प्रशांत महासागरामध्ये तापमान अधिक गरम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम मॉन्सूनदरम्यान अल निनोचा स्तर अधिक वाढलेला दिसून येणार आहे. अशातच भारतातील शेती आणि अर्थव्यवस्था काही प्रमाणात पावसावर निर्भर आहे. मात्र यंदा मुसळधार पाऊस निर्माण झाल्यास शेतीचे देखील मोठे नुकसान होऊ शकते.


