सार
देशभरात पाचव्या टप्यातील मतदान चालू असून अभिनेता अक्षय कुमारने मतदान केले आहे. भारतीय नागरिकत्व मिळवल्यानंतर त्याने प्रथमच मतदान केले आहे. त्याने भारत विकसित आणि मजबूत राहावा यासाठी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही पाचव्या टप्यातील लोकसभेचे मतदान पार पडले जात आहे. नागरिक सकाळपासून मतदान केंद्रावर जात असून आपल्या मतदानाचा हक्क ते बजावताना दिसत आहेत. अभिनेते आणि अभिनेत्री हेही निवडणुकीला मतदान करत असून त्यांनीही सकाळीच उत्साहीपणे मतदानाला हजेरी लावलेली दिसून आले आहे. यामध्ये शाहिद कपूर, अक्षय कुमार, सान्या मल्होत्रा, गोविंदा यांचा समावेश आहे.
अक्षय कुमारने भारतीय नागरिकत्व पहिल्यांदाच केले मतदान -
अभिनेता अक्षय कुमारने भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे. अक्षय कुमारने मतदान केल्यानंतर बोटाला लावलेली शाई दाखवून मीडियाशी संवाद साधला आहे. त्याने पहिल्यांदाच मतदान केल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्याने पुढे बोलताना म्हटले आहे की, भारत विकसित आणि मजबूत व्हावा अशी माझी इच्छा आहे. हे लक्षात घेऊनच मी मतदान केले आहे. भारतातील सर्वानी मतदान करायला हवे असेही यावेळी बोलताना अक्षय कुमारने म्हटले आहे.
अक्षय कुमारने घेतले होते कॅनडाचे नागरिकत्व -
अभिनेता अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व घेतले होते, पण परत त्याने 2009 मध्ये भारतीय नागरिकत्वाची अर्ज केला होता. कॅनडाचा पासपोर्ट सोडण्याच्या भूमिकेबद्दल अक्षय सांगतो की, आज मी जे काही मिळवलं ते येथूनच मिळवलं आहे. त्यामुळे भारतीय नागरिकत्व मिळवताना मला आनंद होत आहे. अक्षय कुमारने भारतीय नागरिकत्व घेतलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
अक्षय कुमार व्यतिरिक्त अजून कोणी केले मतदान? -
अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेत्री जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांनी मतदान केले आहे. दोघांनी मतदान केल्यानंतर मीडियाला फोटो दिले. अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक झोया अख्तर हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले होते. त्यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे.
आणखी वाचा -
लोकसभेचे सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांमध्ये होणार 'टाईट-फाईट'
भारताचे रिझर्व्ह गोल्ड ठेवलेले शहर आहे 'या' देशात, कधीकाळी त्या देशाने केले आहे भारतावर राज्य