लोकसभेचे सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांमध्ये होणार 'टाईट-फाईट'

| Published : May 19 2024, 07:29 PM IST

lok-sabha-election-2024-madhya-pradesh-4th-phase-voting-updates

सार

Lok Sabha 5 th phase voting: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. यात मुंबईतील 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर, धुळे, दिंडोरी,  भिवंडी या 13 लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे

 

Lok Sabha Elections 5th Phase : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (20 मे) मतदानाची रणधुमाळी पार पडणार आहे. राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघातील पाचव्या टप्प्याच्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्यानं सर्वांचंच लक्ष याकडं लागलंय.

चुरशीची लढत

महाराष्ट्रामधील लढत खूपच चुरशीची असल्याचं बोललं जातंय. ईशान्य मुंबईत भाजपाचे मिहीर कोटेचा यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. त्यामुळं संजय दिना पाटील भाजपाचा बालेकिल्ला भेदणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दक्षिण मध्य मुंबईत मातोश्रीच्या दोन आजी-माजी निष्ठावंतात थेट लढत आहे. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळं यापैकी कोण बाजी मारणार?, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

महाराष्ट्रातील 'या' नेत्यांमध्ये होणार 'टाईट-फाईट'

1. दक्षिण मुंबई :

अरविंद सावंत (ठाकरे गट) विरुद्ध यामिनी जाधव (शिंदे गट)

2. दक्षिण मध्य मुंबई :

राहुल शेवाळे (शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)

3. उत्तर पश्चिम मुंबई :

अमोल कीर्तिकर (ठाकरे गट) विरुद्ध रवींद्र वायकर (शिंदे गट)

4. उत्तर मुंबई :

पियूष गोयल (भाजपा) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)

5. उत्तर मध्य मुंबई :

उज्ज्वल निकम (भाजपा) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)

6. ईशान्य मुंबई :

मिहीर कोटेचा (भाजपा) विरुद्ध संजय दिना पाटील (ठाकरे गट)

7. ठाणे :

नरेश म्हस्के (शिंदे गट) विरुद्ध राजन विचारे (ठाकरे गट)

8. कल्याण :

श्रीकांत शिंदे (शिंदे गट) विरुद्ध वैशाली दरेकर (ठाकरे गट)

9. भिवंडी :

कपिल पाटील (भाजपा) विरुद्ध सुरेश म्हात्रे (मविआ) विरुद्ध निलेश सांबरे (अपक्ष)

10. पालघर :

डॉ. हेमंत सावरा (भाजपा) विरुद्ध भारती कामडी (ठाकरे गट) विरुद्ध राजेश पाटील (बहूजन विकास आघाडी)

11. नाशिक :

हेमंत गोडसे (शिंदे गट) विरुद्ध राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) विरुद्ध शांतीगिरी महाराज (अपक्ष)

12. दिंडोरी :

डॉ. भारती पवार (भाजपा) विरुद्ध भास्कर भगरे (मविआ)

13. धुळे :

डॉ. सुभाष भामरे (भाजपा) विरुद्ध शोभा बच्छाव (काँग्रेस)

8 राज्यांतील 49 मतदारसंघात होणार मतदान :

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (20 मे) 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, ओडिशातील 5, झारखंडमधील 3 आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान पार पडणार आहे.