Lok Sabha Election 2024 : येत्या 14-15 मार्चला लोकसभा निवडणुकीच्या ताराखा जाहीर होण्याची शक्यता, सात टप्प्यात मतदान होणार?

| Published : Mar 05 2024, 05:53 PM IST / Updated: Mar 05 2024, 06:02 PM IST

VOTING

सार

निवडणूक आयोगाकडून लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. याशिवाय निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होऊ शकते.

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोग येत्या 14-15 मार्चला आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या तारखांची घोषणा करू शकते. सूत्रांनुसार, वर्ष 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधारावरच यंदाही सात टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. याशिवाय एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडू शकते.

लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच निवडणूक आयोगाकडून (Election Commission) पत्रकार परिषदेची घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांनुसार, निवडणूक आयोग पुढील आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. सध्या निवडणूक आयोग सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचे आकलन करण्यासाठी राज्यांच्या दौऱ्यावर आहे. सर्व राज्यांमधील तयारीचे आकलन केल्यानंतरच निवडणूक आयोग लोकसभेच्या तारखा जाहीर करू शकते.

राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक
निवडणूक आयोगाचे पथक सध्या पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आहे. यानंतर पथक उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि जम्मू-काश्मीरचा (Jammu-Kashmir) दौरा करणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, निवडणूक अधिकारी येत्या 13 मार्चपर्यंत आपला दौरा पूर्ण करू शकतात. अशातच निवडणूक आयोग सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठक करत आहे.

राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच काही पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जारी केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भाजपने आपल्या 195 जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याशिवाय आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलकडूनही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

Lok Sabha Elections 2024 : विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीमध्ये कोणते पक्ष आणि कोणाकडे किती सदस्य? वाचा संपूर्ण यादी

Postal Ballots च्या आधारे मतदान करण्याच्या नियमात बदल, 85 वर्षांपेक्षा कमी वयातील नागरिकांना घरबसल्या मत देता येणार नाही

Modi Sarkar Campaign : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारचे 24 भाषांमधील गाणे लाँच

Read more Articles on