सार
एशियानेट न्यूज पोर्टलवर 5 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
१. कोणी चुकीचे कृत्य केले आहे, तोच माफी मागत असतो, ज्याने चुकीचे कृत्य केलेले नाही त्याच्यावर माफी मागण्याची वेळ येत नाही. सांगलीतील सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
२. आम्ही लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार; सांगलीत राहुल गांधींसमोरच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गें यांनी मोठी घोषणा केली आहे.
३. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार चेतन पाटीलला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कडक पोलीस बंदोबस्तात दोघांना कोर्टात हजर केले. यावेळी कोर्टात आरोपीचे वकील गणेश सोवनी यांनी कोर्टात बाजू मांडली. पुतळा कोसळल्याची घटना नैसर्गिक आहे. त्यामुळे जयदीपवर गुन्हा कसा दाखल केला? तसेच दबावाखाली FIR नोंदवली आहे, असा युक्तिवाद आपटेंच्या वकिलांनी मालवण दिवाणी न्यायालयात केला.
४. कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने 750 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कृषी स्टार्टअप्सना आर्थिक मदत देण्यासाठी 'कृषी' फंड सुरु करण्यात आला आहे.
५. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. याशिवाय शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
६. श्रीलंकेच्या नौसिकांकडून अटक करण्यात आलेल्या तमिळनाडूमधील रामेश्वरम येथील 7 मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे. या मच्छिमारांनी 23 जुलैला सीमा ओलांडल्याने ताब्यात घेतले होते.
७. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली बनावट अर्ज करणाऱ्या एका व्यक्तीसह त्याच्या पत्नीला अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माहिती देत असेही म्हटले की, सर्व अर्ज एकाच बँक खात्याने भरले होते. पण अर्जासाठी काही आधार कार्ड्सचा वापर करण्यात आला होता.
८. कशेडी घाटात गावाकडे कोकणात निघालेल्या दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 80 प्रवासी होती. पण सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नसून सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहेत.