सार
एशियानेट न्यूज पोर्टलवर 4 ऑक्टोबरच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
- चिट फंड प्रकरणात सुरु असलेल्या तपासाअंतर्गत ईडीकडून कोलकाता, पंजाब, दिल्ली आणि मुंबईतील दोन डझनभर ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
- केंद्राकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने उद्धव ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे अभिमानाची गोष्ट आहे. मराठीसह बंगाली, पाली, आसामी आणि प्राकृत भाषेलाही तो दर्जा दिला गेला. पण आम्ही अनेक वर्षांपासून अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी करत होते. पण राज्यातील सर्व पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचीही हिच मागणी होती. पण अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे एकट्या व्यक्तीचे कतृत्व नाही. मात्र भाजपाला प्रत्येकवेळी श्रेय लाटण्याची सवय आहे.
- नवरात्रौत्सवाची आज दुसरी माळ असून देवी ब्रम्हचारिणीची पूजा केली जाणार आहे. आजही देवीच्या मंदिरात भाविकांची देशभरातील मंदिरात मोठी गर्दी होताना दिसून येत आहे.