सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 30 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

 

  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीएम मोदींना आणखी एक पत्र लिहून 'कठोर' केंद्रीय कायदा आणि बलात्कार आणि हत्येच्या अशा क्रुर गुन्ह्यांवर शिक्षा आणि विशिष्ट कालावधीत खटले निकाली काढण्याची मागणी केली आहे.
  • म्हाडा घरांच्या सोडतीसंदर्भात महाराष्ट्रातील सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, राज्य सरकारने घरांसाठी अर्ज करण्याची तारीख 19 सप्टेंबरपर्यंत केली आहे. याशिवाय सोडतीमधील घरांच्या किंमतीत 10 ते 25 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे.
  • उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती.
  • केरळातील फिल्म मेकर रंजीत यांच्या विरोधात एका पुरुश कलाकाराने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत असे म्हटले आहे की, दिग्दर्शकाने माझ्यावर वर्ष 2012 मध्ये नग्न होण्यासह लैंगिक अत्याचार केले आहेत. मला बंगळुरुतील हॉटेलमध्ये ऑडिशनसाठी बोलावून त्यावेळी अत्याचार केले. याशिवाय दुसऱ्या दिवशी दिग्दर्शकाने पैसेही ऑफर केले असेही कलाकाराने तक्रारीत म्हटले आहे.
  • उत्तर प्रदेशातील बहराइच येथे लांडग्यांनी 8 जणांचा जीव घेतला आहे. यामुळे चार लांडग्यांना पकडण्यात यश आले असून अन्य दोन लांडग्यांचा शोध घेतला आहे.