गुरुवार, 29 ऑगस्ट 2024 च्या मोठ्या बातम्या, वाचा एका क्लिकवर

| Published : Aug 29 2024, 08:53 AM IST / Updated: Aug 29 2024, 03:50 PM IST

Daily Updates

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 29 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचे हत्यार उपसले असून 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असे त्यांनी जाहीर केले.

२. देवेंद्र फडणवीस यांचा सगळे लोक काटा काढणार आहेत. त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत, माझ्याजवळ येऊन सगळे लोक बोलतात, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

३. राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मनीषा आव्हाळे, अभिनव गोयल, विनायक महामुनी, सतीशकुमार खडके, सौम्या चांडक, कुलदीप जंगम आणि प्रदीपकुमार डांगे यांचीही बदली करण्यात आली आहे.

४. बुलढाण्यात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी एक पोलीस कर्मचारी धूत असल्याचा व्हिडिओ टाकत सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी रक्षणासाठी आहेत की आमदारांची गाडी धूण्यासाठी आहेत असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना केलाय.

५. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी मीडियासोबत संवाद साधताना म्हटले की, “महाविकास आघाडीकडून एकत्रितपणे निवडणूक लढवली जाणार आहे. आतापर्यंत आम्ही दोनदा जागा वाटपाबद्दल बोललो आहोत. आमचे नेते लवकरच भेटणार असून जागा वाटपाबद्दल चर्चा करणार आहोत. आम्ही महाविकास आघाडी असून निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी चेहरा कोण असणार हे ठरवू. महाविकास आघाडीकडून अधिकाधिक जागांवर निवडणूक लढवली जाईल. युतीमध्ये कोणतेही मतभेद होणार नाहीत. आम्ही युती धर्माचे पालन करू आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊ.

६. उत्तर प्रदेशातील प्रयागराज मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

७. आज देशभरात मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी केली जात आहे. या निमित्त केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मालविया यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना म्हटले की, आज राष्ट्रीय क्रीडा दिवस असल्याने मेजर ध्यानचंद यांना आदरलांजली वाहणार आहोत. 

८. गुजरातला रेड अ‍ॅलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे. सध्या गुजरातमधील 18 जिल्ह्यांना फटका बसला असून काही ठिकाणी पुरपरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याकडून गुजरातमधील सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर, पोरबंदर, अमरेली, भावनगर, मोरबी, द्वारका, गीर अशा काही भागांसाठी रेड अ‍ॅलर्ट जारी केला आहे.