सार
एशियानेट न्यूज पोर्टलवर 24 ऑक्टोबरच्या ताज्या अपडेट्स जाणून घ्या. झारखंडच्या मुख्यमंत्री पत्नी कल्पना सोरेन यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. निलेश राणे शिंदे गटात सामील झाले आहेत. या आणि इतर बातम्या वाचा फक्त एका क्लिकवर.
- झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी आणि जेएमएम नेत्या कल्पना सोरेन यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.
- निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवनेसेत प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, मोठ्या संख्येने लोक येत आहेत. निलेश राणे यंदाच्या निवडणुकीत 52 हजार मताधिक्यांनी विजय मिळवतील असा विश्वासही व्यक्त केला आहे.
- काँग्रेस नेते विजय वटेड्डीवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात आम्ही 200 जागा जिंकू असा विश्वास देखील विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
- ओडिसा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर येत्या 24-25 ऑक्टोबरला दाना वादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
- दिल्लीतील कालिंदी कुंज परिसरात यमुना नदीच्या पृष्ठभागावर विषारी फेस तरंगत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज येत्या 28 ऑक्टोबरला गुजरातमधील वडोदरा येथे दौऱ्यावर येणार आहेत.
- बांग्लादेशाकडून शेख हसीना यांच्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.