Zubeen Garg Wife Reaction: आसामचे प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांच्या सिंगापूरमधील मृत्यूनंतर एक मोठा खुलासा झाला आहे. त्यांचा चुलत भाऊ आणि आसाम पोलीस अधिकारी संदिपन गर्ग यांना अटक करण्यात आली आहे. 

Zubeen Garg Wife Reaction: गायक झुबिन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी आसाम पोलीस सातत्याने कठोर कारवाई करत आहेत. यापूर्वी त्यांचे व्यवस्थापक आणि इव्हेंट ऑर्गनायझर यांना अटक करण्यात आली होती आणि आता आणखी एकाला अटक झाली आहे. झुबिनचा चुलत भाऊ, डीएसपी संदिपन गर्ग यांना ताब्यात घेण्यात आले आहे. संदिपन आसाम पोलीस सेवेत कामरूप जिल्ह्यात तैनात आहेत. त्यांच्या अटकेनंतर झुबिनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

संदिपन यापूर्वी कधीही परदेशात गेला नव्हता

गरिमा गर्ग यांनी सांगितले की, संदिपन यापूर्वी कधीही परदेशात गेला नव्हता आणि त्याने झुबिनसोबत सिंगापूरला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. गरिमा यांच्या म्हणण्यानुसार, "जेव्हा संदिपनने झुबिनसोबत जाण्याबद्दल सांगितले, तेव्हा झुबिन आनंदाने त्याला सोबत घेऊन गेला." गरिमा यांनी हेही सांगितले की, त्यांना संदिपनच्या अटकेची माहिती आहे, पण त्या तपासावर कोणतीही टिप्पणी करत नाहीत. त्या म्हणाल्या, "कदाचित संदिपनच्या जबाबात काहीतरी सुगावा लागला असेल. तपास सुरू आहे, त्यामुळे मी यावर काही बोलू शकत नाही."

१९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये गायकाचा मृत्यू झाला होता

एसआयटीचे प्रमुख आणि आसाम पोलिसांचे विशेष डीजीपी एम.पी. गुप्ता म्हणाले, "आम्ही संदिपनची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली आहे. तपास अजूनही सुरू असल्याने, मी यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही." १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये एका यॉट पार्टीदरम्यान गायक झुबिन गर्ग यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांचा चुलत भाऊ डीएसपी संदिपन गर्गही यॉटवर उपस्थित होता आणि त्याची यापूर्वीही चौकशी झाली होती. ५२ वर्षीय झुबिन पोहताना बुडाले होते. यावेळी त्यांच्यासोबत काही सहकारी आणि मित्रही होते. यॉट पार्टीदरम्यान हे लोक पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते.

झुबिनचे आपल्या चुलत भावावर खूप प्रेम होते

गरिमा यांनी झुबिन आणि संदिपन यांच्या नात्याबद्दलही सांगितले. त्या म्हणाल्या की, झुबिनला त्याचा चुलत भाऊ संदिपनचा अभिमान वाटत होता, विशेषतः जेव्हा संदिपनने नुकतीच आसाम पोलीस सेवा जॉईन केली. यापूर्वी संदिपन मॉडेलिंग आणि अभिनय करत होता. गरिमा म्हणाल्या, "संदिपनने आमच्यासोबत ३-४ मॉडेलिंग प्रोजेक्ट केले होते. झुबिन नेहमी त्याला प्रोत्साहन देत असे आणि चुलत भाऊ म्हणून त्याच्यावर खूप प्रेम करत असे."