यामी गौतमच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन, लग्नाच्या 3 वर्षानंतर अभिनेत्रीला पुत्र प्राप्ती

| Published : May 20 2024, 12:32 PM IST

Yami Gautam
यामी गौतमच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन, लग्नाच्या 3 वर्षानंतर अभिनेत्रीला पुत्र प्राप्ती
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमच्या घरामध्ये नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. यामीने आज 20 मे रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. यामीने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. यासोबतच यामीने तिच्या मुलाचे नाव आणि नावाचा अर्थही उघड केला आहे.

 

मनोरंजन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमच्या घरामध्ये नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. यामीने आज 20 मे रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. यामीने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. यासोबतच यामीने तिच्या मुलाचे नाव आणि नावाचा अर्थही उघड केला आहे.

View post on Instagram
 

यामी-आदित्यचे लग्न 3 वर्षांपूर्वी झाले होते : 

विकी डोनर या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या यामी गौतमने अनेक टीव्ही शो आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिने 'बदलापूर', 'ॲक्शन जॅक्सन', 'सनम रे', 'जुनूनियत', 'काबिल', 'सरकार 3', 'बत्ती गुल मीटर चालू', 'बाला' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर यामीचा पती आदित्य धरने 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. आदित्य दिग्दर्शकासोबतच लेखक आणि गीतकारही आहे. 'उरी'च्या शूटिंगदरम्यान यामी आणि आदित्यची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली होती.

प्रेग्नन्सीमध्ये सिनेमाचा शूटिंग :

प्रेग्नन्सीमध्ये सिनेमाचा शूटिंग अनुभव यामीने शेअर केला होता. ती म्हणाली, पहिलं मूल नेहमीच चॅलेजिंग असतं. त्यामुळे माझ्यासाठी देखील हे मानसिकदृष्ट्या थकवा आणणारं होतं. मी तर यावर आता पुस्तक लिहू शकते. पण, जर आदित्य माझ्याबरोबर नसता तर मी हे करू शकले नसते. अशावेळी तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता असते. मी सगळ्या डॉक्टरांचे आभार मानते. ते लपून माझ्यावर लक्ष ठेवायचे. मला चेक करायचे. गरोदरपणात काम करण्याची प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळाली आहे. कारण, मी तिला प्रत्येक प्रसंगात काम करताना पाहिलेलं आहे.

20 कोटी रुपयांच्या बजेट 81 कोटी रुपयांची कमाई :

अवघ्या 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८१ कोटी रुपयांची कमाई केली होती. आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती व लेखन यामी गौतमचा पती आदित्य धर याने केलं होतं.

आणखी वाचा :

अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'ची नवी रिलीज डेट आली समोर, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

जॅकी श्रॉफचे नाव आणि आवाज वापरल्यास अडचणीत येऊ शकता,जाणून घ्या का ?