रितेश आणि जिनिलियात झालं कडाक्याचं भांडण, कारण कळल्यावर हसू हसू पोटात येईल कळ
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या लोकप्रिय जोडीने 'राजा शिवाजी' सिनेमाच्या शूटिंगमधून वेळ काढून दिवाळी साजरी केली. त्यांनी सोशल मीडियावर एक विनोदी व्हिडीओ शेअर केला आहे.

रितेश आणि जिनिलियात झालं कडाक्याचं भांडण, कारण कळल्यावर हसून पोटात येईल कळ
जिनिलिया आणि रितेश देशमुख ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. या जोडीकडे आजपर्यंत अनेकांनी आदर्श म्हणून पाहिलं आहे. सोशल मीडियावर ते दोघे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.
शुटिंगमधून वेळ काढून साजरी केली दिवाळी
गेल्या काही दिवसांपासून राजा शिवाजी या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं आहे. शुटिंगमधून वेळ काढून दोघांनी मुलांसोबत दिवाळी साजरी केल्याचं सोशल मीडियावरच्या पोस्टमधून दिसून आलं आहे.
मुंबईत साजरी केली दिवाळी
मुंबईत दिवाळी दोघांनी मिळून साजरी केल्याचं दिसून आल आहे. रितेश आणि जिनिलिया यांनी सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या दोघांच्यातला हा व्हिडीओ प्रेक्षकांना आवडला आहे.
रितेशचा विनोद ऐकून येईल हसू
रितेश देशमुखचा विनोद ऐकून प्रेक्षकांना हसू येईल. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या दोघांच्या प्रेक्षकांना हा व्हिडीओ पाहून हसायला आवरत नाही. त्यांनी दिवाळीच्या सुट्यांमध्ये हा व्हिडीओ अपलोड केला आहे.
व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आल्या?
व्हिडिओवर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी भाऊ वहिनी बेस्ट एकदम, तुम्ही दोघे कमाल आहात, २ बेस्ट कॉमेडीयन्स मस्त, दादा वहिनी इज बॅक अशा आशयाच्या प्रतिक्रिया आल्याचं दिसून आलं आहे.

