- Home
- Entertainment
- Big Boss 19: प्रणित मोरेची 'ही' मैत्रीण पडली एकटी, तिचा चेहरा पाहून डोक्यावर पडतील आठ्या
Big Boss 19: प्रणित मोरेची 'ही' मैत्रीण पडली एकटी, तिचा चेहरा पाहून डोक्यावर पडतील आठ्या
बिग बॉस १९ मधून प्रणित मोरे आजारपणामुळे बाहेर पडला आहे. त्याला डेंग्यू झाल्याने घराबाहेर जावे लागले. प्रणितच्या जाण्याने त्याची खास मैत्रीण मालती अत्यंत दुःखी झाली असून, घरात तोच तिचा एकमेव मित्र असल्याचे तिने म्हटले आहे.

Big Boss 19: प्रणित मोरेची 'ही' मैत्रीण पडली एकटी, तिचा चेहरा पाहून डोक्यावर पडतील आठ्या
बिग बॉस १९ कायमच चर्चेत राहत असते. यामध्ये आता प्रणित मोरेने एक्सिट घेतली असून त्याच्या खास मैत्रिणीला करमत नसल्याचं दिसून आलं आहे. त्याची ही खास मैत्रीण कोण आहे तेच आपण जाणून घेऊयात.
प्रणित आजारपणामुळे पडला बाहेर
प्रणित हा कमी मत पडल्यामुळे नाही तर आजारपणामुळे बाहेर पडल्याची माहिती बिग बॉस टीमच्या वतीने देण्यात आली आहे. त्याला डेंग्यू झाला होता आणि अशातच तब्येत बिघडल्यामुळे त्याला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
प्रणित आजारपणामुळे पडला बाहेर
प्रणित आजारपणामुळे बिग बॉसच्या बाहेर पडला आहे. त्याच्या टीमने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. प्रणित बाहेर पडल्यामुळे आपल्याला एकटं वाटत असल्याची प्रतिक्रिया मालतीने व्यक्त केली.
तो एकच माझा चांगला मित्र
तो एकच माझा चांगला मित्र होता अशी प्रतिक्रिया यावेळी मालतीने व्यक्त केली आहे. माझा तर या घरातला तो एकमेव मित्र होता आणि तो निघून गेला अशा शब्दात मालतीने यावेळी दुःख व्यक्त केलं आहे.
प्रणित बाहेर जाताना मालतीने मारली घट्ट मिठी
प्रणित घराच्या बाहेर चालला होता त्यावेळी मालतीने त्याला घट्ट मिठी मारली होती. तसेच तिने त्याला काळजी घेण्याचं अवाहन केलं होतं. त्या दोघांमधील मैत्री किती घट्ट होती हे यावरून दिसून येतं.
मालती पडली एकटी
आता मालती बिग बॉसच्या घरामध्ये एकटी पडल्याचं दिसून आलं आहे. प्रणित बाहेर गेल्याच वाईट वाटत असल्याचं यावेळी बोलताना मालतीने म्हटलं आहे. मालती आणि तान्या यांच्यातील हा संवाद व्हायरल झाला आहे.

