साडेतीन तासानंतर प्राजक्ता माळी कुठं सापडली, किस्सा वाचून म्हणाल बालपण देगा देवा
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या बालपणीचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे. ती शांत स्वभावाची असल्यामुळे एकदा घरातच कॉटखाली लपून भातुकुळी खेळत होती, ज्यामुळे ती साडेतीन तास कोणालाच सापडली नाही.

साडेतीन तासानंतर प्राजक्ता माळी कुठं सापडली, किस्सा वाचून म्हणाल बालपण देगा देवा
प्राजक्ता माळी ही अभिनेत्री कायमच चर्चेत राहत असते. ती कधी तिच्या बोल्ड भूमिकांसाठी प्राजक्ता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कॉमेडीची हास्यजत्रामध्ये तिने केलेल्या भूमिकेमुळं तीच मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं होतं.
प्राजक्ताने जुन्या आठवणींना दिला उजाळा
प्राजक्ताने काही दिवसांवपूर्वी झालेल्या मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्राजक्ताचे वडील पोलिसात होते. सुरुवातीला त्यांनी स्वारगेट पोलीस चौकीला काम केलं आणि नंतर वाकडला बदली झाली.
सोमवार पेठेत शिफ्ट झाल्यावर काय झालं?
प्राजक्ता सोमवार पेठेत शिफ्ट झाल्यानंतर त्यांचं कुटुंब सोमवार पेठेत शिफ्ट झालं. त्यावेळी त्यांचे आजोबा सोबत राहायचे, आजोबा पोलीस खात्यात असल्याची माहिती यावेळी प्राजक्ताने दिली आहे.
शाळा कॉलेजात असताना प्राजक्ता होती शांत
शाळा कॉलेजमध्ये असताना प्राजक्ता अतिशय शांत होती. तिला लाजाळू अगदी छोट्या सर्कलमध्ये चालणारी होती. प्राजक्ता सतत अभ्यास करत असायची, तिला खेळायला जा असं आईला सांगावं लागायचं.
प्राजक्ता माळी हरवली
प्राजक्ता एकदा लहानपणी हरवल्याची किस्सा तिने यावेळी बोलताना शेअर केला आहे. साडेतीन तास काहीच आवाज न करता कॉटच्या खाली प्राजक्ता भातुकुळीचा खेळ खेळत होती.
मी इतकी शांत होते
मी इतकी शांत होते की मी कुठं गेलेय हे कोणालाच समजलं नाही. यावेळी मी कॉटच्या खाली लपून भातुकुलीचा खेळ खेळत असल्याचं तिने सांगितलं. साडेतीन तासानंतर प्राजक्ता घरच्यांना मिळाली.

