- Home
- Entertainment
- सात जन्म सोडा, हा एकच जन्म पुरेसा आहे; गोविंदाच्या पत्नीने केलेलं वक्तव्य वाचून कपाळावर पडतील आठ्या
सात जन्म सोडा, हा एकच जन्म पुरेसा आहे; गोविंदाच्या पत्नीने केलेलं वक्तव्य वाचून कपाळावर पडतील आठ्या
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनावर भाष्य केले आहे. गोविंदाने पत्नीपेक्षा जास्त वेळ हिरोईन्ससोबत घालवला असून तो एक चांगला पती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सात जन्म सोडा, हा एकच जन्म पुरेसा आहे; गोविंदाच्या पत्नीने केलेलं वक्तव्य वाचून कपाळावर पडतील आठ्या
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा या कायमच माध्यमांमध्ये चर्चेत असतात. त्यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यातून गोविंदा आणि सुनीता या दोघांमध्ये वाद सुरु असल्याची माहिती समजली आहे.
गोविंदाच्या चुकांबद्दल काय म्हणाल्या?
गोविंदाच्या चुकांबद्दल यावेळी सुनीता यांनी मत व्यक्त केलं आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, “प्रत्येकाने स्वतःला सांभाळून ठेवायला हवं. तरुणपणी चुका होतात, मीही केल्या आहेत आणि गोविंदानेही केल्या आहेत.
सुंदर कुटुंब असताना चुका का करायच्या?
सुंदर कुटुंब असताना चुका का करायच्या हा प्रश्न यावेळी सुनीता यांनी विचारला. त्या पुढं बोलतात की, जेव्हा वयाची एक मर्यादा येते, आणि त्यानंतरही माणूस चुका करत राहतो, तेव्हा ते शोभत नाही. आणि का करायच्या चुका? पत्नी आहे, सुंदर मुलं आहेत, मग का?”
गोविंदाने घरापेक्षा जास्त वेळ कुठं दिला?
यावेळी बोलताना पत्नी सुनीताने घरापेक्षा जास्त वेळ गोविंदाने बाहेर दिल्याचं म्हटलं आहे. “ आमचं विचारविश्व पूर्ण वेगळं आहे. त्यांची विचारसरणी वेगळी, माझी वेगळी. आज मी जिवंत आहे, कारण मला माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे. मला वाटतं माझी मुलं फक्त माझ्यावरच प्रेम करावीत.
एका स्टारची पत्नी असणं सोपं नाही
तो हिरो आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलणार? पण पत्नीपेक्षा जास्त वेळ तो हिरोईन्ससोबतच घालवतो. एका स्टारची पत्नी असणं सोपं नसतं. मन खूप मजबूत बनवावं लागतं, कधी कधी ते दगडासारखं करावं लागतं. मला हे सगळं समजायला तब्बल 38 वर्ष लागली. तरुणपणी हे काही जाणवलंच नव्हतं.”असं सुनीता आहुजाने म्हटलं आहे.
सात जन्म सोडा हा एकच जन्म पुरा आहे
सात जन्म सोडा हा एकच जन्म पुरेसा असल्याचं यावेळी सुनीता यांनी म्हटलं आहे. “गोविंदा एक चांगला मुलगा आहे, चांगला भाऊ आहे, पण नवऱ्याच्या भूमिकेत नाही. पुढच्या जन्मी तो माझा नवरा म्हणून नाही, तर मुलगा म्हणून यावा, अशी माझी इच्छा आहे.

