- Home
- Entertainment
- 'हा' अभिनेता दिवाळी करत नाही साजरी, त्याच्या आयुष्यातील घटना ऐकून तुम्हीही राहाल अंधारात
'हा' अभिनेता दिवाळी करत नाही साजरी, त्याच्या आयुष्यातील घटना ऐकून तुम्हीही राहाल अंधारात
अभिनेता दिलजीत डोसांझने एका व्हिडिओद्वारे तो दिवाळी का साजरी करत नाही याचे कारण सांगितले आहे. पूर्वी उत्साहाने दिवाळी साजरी करणारा दिलजीत आता कुटुंबापासून वेगळा झाल्यामुळे हा सण साजरा करत नाही.

'हा' अभिनेता दिवाळी करत नाही साजरी, त्याच्या आयुष्यातील घटना ऐकून तुम्हीही राहाल अंधारात
बॉलिवूडमधील सेलिब्रेटी मोठ्या उत्साहात सण साजरे करत असतात, त्यातच दिवाळी म्हटल्यावर ती तर मोठया आनंदाने साजरी केली जाते. पण इंडस्ट्रीमध्ये असा एक अभिनेता असून जो दिवाळी साजरी करत नाही.
दिलजीतने व्हिडीओ केला शेअर
दिलजीत डोसांझ याने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये तो दिवाळी का साजरी करत नाही याबद्दल सांगितलं आहे. तो त्यामध्ये दिवाळी का साजरी करत नाही याबद्दलची माहिती देतो.
टीम दिलजीत ग्लोबल अकाउंटवर शेअर केला व्हिडीओ
दिलजीतने टीम दिलजीत ग्लोबल या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं म्हटलं आहे की, त्याला दिवाळी खूप आवडते आणि तो दरवेळी फटाके आवर्जून उडवत असतो. पण आता त्याला भीती वाटायला लागली आहे.
दिलजीतला दिवाळीची भीती का वाटते?
दिलजीतला दिवाळीची भीती का वाटते याची माहिती त्यानं यावेळी दिली आहे. आधी तो आणि त्याचे कुटुंबीय दिवाळीची तयारी एक महिना आधीपासून करायचे. कुटुंबापासून वेगळं झाल्यानंतर दिलजीतने दिवाळी साजरी करणे पूर्णपणे बंद करून टाकलं.
महिनाभर आधीपासून दिवाळीची तयारी व्हायची सुरु
दिलजीत सांगतो की, महिनाभर आधीपासून त्याच्या घरी दिवाळीची तयारी सुरु व्हायची. त्याचे घर आणि आजूबाजूचा परिसर लाईट लावून सजवला जात असायचा. ते संध्याकाळी फटाके फोडून देवाच्या दर्शनाला जायचे.
रात्री उशिरापर्यंत हे सुरु राहायचे
दिलजीत यावेळी बोलताना भावुक झाला होता. कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर मी दिवाळी साजरी करत नसल्याचं दिलजीतने म्हटलं आहे. त्याने आता मला फटाक्याची भीती वाटत असल्याची माहिती दिली.