डास घरात शिरायच्या आधीच पळून जातील, हे सोपे घरगुती उपाय नक्की वापरून बघा!
Mosquito Control At Home: डास पूर्णपणे नष्ट करता येत नसले तरी, योग्य स्वच्छता आणि घरगुती उपायांनी त्यांचा उपद्रव निश्चितच कमी करता येतो. स्वच्छ परिसर, पाणी साचू न देणे आणि नैसर्गिक उपाय वापरणे हा सर्वोत्तम बचाव आहे.
17

Image Credit : stockphoto
घरातून डासांना पळवण्यासाठी घरात करा हे सोपे उपाय
डासांना घरातून पळवून लावण्यासाठी घरी करता येण्यासारखे काही सोपे उपाय कोणते आहेत ते पाहूया.
27
Image Credit : our own
पाणी साचू देऊ नका
सेप्टिक टँक आणि पाणी साठवण्याच्या टाक्या नेहमी झाकून ठेवाव्यात.
37
Image Credit : Pixabay
मच्छरदाणी
खिडक्या आणि दारांना मच्छरदाणी लावा. संध्याकाळ होण्यापूर्वी दारे आणि खिडक्या बंद करा आणि बारीक जाळीने झाका.
47
Image Credit : Google
लसूण
डासांपासून सुटका मिळवण्यासाठी लसूण हा एक उत्तम उपाय आहे. लसूण ठेचून पाण्यात उकळा आणि ते पाणी खोलीत शिंपडल्यास डास दूर राहतात.
57
Image Credit : Getty
लवंग
लिंबामध्ये लवंगा खोचून खोलीत ठेवल्याने डासांना दूर ठेवण्यास मदत होते.
67
Image Credit : Getty
कडुलिंबाचे तेल
कडुलिंबाचे तेल शरीरावर लावल्यास डास चावण्यापासून बचाव होतो.
77
Image Credit : Getty
तुळशीची पाने
तुळशीच्या पानांचा धूर करणे किंवा ती खोलीत ठेवणे हा डासांना पळवून लावण्याचा आणखी एक मार्ग आहे. डासांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी खिडकीत किंवा दाराबाहेर तुळशीची पाने ठेवा.

