Varun Dhawan : वरुण धवनच्या घरी आली लक्ष्मी, संपूर्ण धवन कुटुंब आनंदी

| Published : Jun 04 2024, 12:36 PM IST

Varun Dhawan Natasha Dalal Blessed  With Baby Girl

सार

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन वडील तर नताशा आई बनली आहे. काही तासांपूर्वीच नताशाने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी खुलासा केला आहे की त्यांच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन वडील तर नताशा आई बनली आहे. काही तासांपूर्वीच नताशाने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळीच नताशाला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतेच वरुणचे वडील आणि बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी खुलासा केला आहे की त्यांच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला आहे.

काल रात्री पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. आता अभिनेत्याने आपल्या इंस्टा कुटुंबासाठी ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्याने ॲनिमेटेड पोस्टद्वारे चाहत्यांसह घोषणा शेअर केली, ज्यामध्ये एक पाळीव कुत्रा जॉय बेबी धवनच्या नावाखाली 'वेलकम धाकटी बहिण' या बोर्डसह उभा आहे.

या पोस्टसोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की,आमच्या मुलीचा जन्म झाला आहे. आई आणि मुलासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे. ही पोस्ट शेअर होताच चाहते आणि सेलिब्रिटींनी हार्ट इमोजी या पोस्ट शेअर केल्या आहेत.

View post on Instagram
 

या पोस्टवर टिप्पणी करताना कोरिओग्राफर रेमो डिसूझाने लिहिले, अभिनंदन. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. गायक अरमान मलिकने लिहिले, तुम्हा दोघांचे आणि तुमच्या कुटुंबाचे अभिनंदन. अभिनेता मनीष पॉलने लिहिले, तुमचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन. बिपाशा बसू आणि ईशा गुप्ता या अभिनेत्रींनी कमेंटमध्ये 'बधाई हो' शेअर केला आहे.

लक्ष्मीच्या आगमनाने धवन कुटुंब आनंदी :

नताशा आणि वरुण पहिल्यांदाच पालक झाले आहेत. आजोबा बनल्याचा आनंद डेव्हिड धवनच्या यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यादरम्यान वरुण धवन काही वेळ वडिलांना ड्रॉप करण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर आला आणि नंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेल्याचे पाहायला मिळाले आहे.

चाहतेही खुश :

वरुण आणि नताशा आई-वडील झाल्यामुळे खूप आनंदी आहेत आणि संपूर्ण धवन कुटुंब राजकुमारीच्या आगमनाचा आनंद साजरा करत आहे. या जोडप्याच्या या गुड न्यूजने त्यांचे सर्व चाहते खूश आहेत आणि भावूकही झाले आहेत. सोशल मीडियावर सर्व चाहते वरुणला वडील झाल्याबद्दल शुभेच्छा देत आहेत.