- Home
- Entertainment
- जय भानुशाली-माही वीज 15 वर्षांच्या संसारानंतर घेणार घटस्फोट? दोघांच्या तीन मुलांचे काय होणार?
जय भानुशाली-माही वीज 15 वर्षांच्या संसारानंतर घेणार घटस्फोट? दोघांच्या तीन मुलांचे काय होणार?
Jay Bhanushali and Mahhi Vij will take Divorce : टीव्ही अभिनेते जय भानुशाली आणि माही विज लग्नाच्या १५ वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. २०१० मध्ये लग्न केलेल्या या जोडप्याला तीन मुले आहेत आणि ते काही काळापासून वेगळे राहत होते.

जय भानुशाली आणि माही विज यांचा घटस्फोट
टीव्ही अभिनेते जय भानुशाली आणि माही विज लग्नाच्या १५ वर्षांनंतर घटस्फोट घेणार आहेत. २०१० मध्ये लग्न केलेल्या या जोडप्याला तीन मुले आहेत आणि ते काही काळापासून वेगळे राहत होते. त्यामुळे दोघांमध्ये पती-पत्नीचे नाते जवळपास नसल्याचे सांगितले जात आहे. आता दोघांच्या मुलांचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घटस्फोट निश्चित, मुलांचा ताबाही ठरला
रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या झाल्या आहेत. एका सूत्राने सांगितले की, 'खूप प्रयत्न केले, पण काही बदलले नाही.' मुलांचा ताबाही ठरला आहे. विश्वासाच्या मुद्द्यांवरून तणाव वाढला. दोघांमध्ये सातत्याने खटके उडत असल्याने दोघांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. पण पॅचअप काही झाले नाही.
सोशल मीडियावर दुरावा, नात्यावर मौन
या जोडप्याने एकत्र फोटो पोस्ट करणे बंद केले होते. लग्नाबद्दल विचारल्यावर माहीने उत्तर देणे टाळले. 'मी तुम्हाला का सांगू?' असे ती म्हणाली. यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना जोर आला. आता यावर जवळपास शिक्कामोतर्ब झाल्याचे सांगितले जात आहे.
जयची माहीसोबतची लव्ह स्टोरी
जयने सांगितले होते की तो ३ महिन्यांतच माहीच्या प्रेमात पडला होता. त्याने ३१ डिसेंबर २००९ रोजी तिला प्रपोज केले आणि २०१० मध्ये लग्न केले. त्यावेळी त्याला कॅसानोव्हा समजले जात होते. झटपट लग्न केल्याने त्यांच्यावर टिकाही झाली होती.

