अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी सोशल मीडियावर एक गुड न्यूज शेअर केली आहे. त्यांनी बेबी बंपसोबतचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची घोषणा केली. 

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी एक गुड न्यूज शेअर केली आहे. त्यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं सोशल मीडियावरून त्यांनी जाहीर केलं आहे. बेबी बंपसोबत ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कतरीना कैफने सोशल मीडियावरून फोटो शेअर केला आहे.

फोटो टाकल्यानंतर चाहत्यांनी केलं अभिनंदन 

सोशल मीडियावर फोटो टाकल्यानंतर त्यावर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक करून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. मागील अनेक महिन्यांपासून कतरीना प्रेग्नन्ट असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकत होत्या पण आता त्याला अधिकृत पुष्टी मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्या दोघांचा एअरपोर्टवरील फोटो प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये व्हाईट लूज ड्रेसमध्ये कतरिना दिसल्यावर प्रेग्नन्सीच्या चर्चांनी जोर धरला.

View post on Instagram

विकी एकटा आल्यावर पटली खात्री 

विकी आर्यन खानच्या चित्रपटाच्या प्रमोशनल एकटाच आला होता, त्यावेळी कतरीना प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चांनी जोर पकडला होता. मागील आठवड्यात कतरिनाचा एक फोटो व्हायरल झाला होता, त्यामध्ये ती गरोदर असल्याचं दिसून आलं होतं. एका रेड इट वरच्या युझरने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला होता, त्यावरून चर्चांना सुरुवात झाली होती.

दोघांनी फोटो केला शेअर 

दोघांनी सोशल मीडियावरून एक गोड फोटो शेअर केला आहे. त्यांनी, सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर एक सुंदर, ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत सर्वांना आयुष्यात येणाऱ्या गोड पाहुण्याबद्दल सांगितलं. यामध्ये एक फोटो प्रिंट असलेली फ्रेम असून त्यात गरोदर कतरिना आणि विकी कौशल बेबी बंपकडे प्रेमाने पहात असल्याचं दिसतंय.

काय कॅप्शन दिलं?

 On our way to start the best chapter of our lives with hearts full of joy and gratitude. 🙏🏽 अशी सुंदर कॅप्शनही त्यांनी या पोस्टसोबत जोडली आहे. या फोटोवर चाहत्यांसोबत अभिनेते आणि अभिनेत्री यांनी कमेंट केली आहे. आता विकी-कतरिनाचं बाळ या जगात कधी येतं, त्यांना मुलगा होतो का मुलगी याची चाहत्यांना आणि सर्वांनाच उत्सुकता आहे.