२०२५ मध्ये रिलीज झालेल्या 'दशावतार' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 'गुलकंद'चा रेकॉर्ड मोडला आहे. ११ दिवसांत १६.६५ कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत.
मराठी सिनेमासृष्टीसाठी २०२५ हे वर्ष चांगले भरभराटीचे असल्याचं दिसून आलं आहे. यावर्षी अनेक चांगले चित्रपट रिलीज झाले असून काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या गुलकंद चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आता त्या सिनेमाचा रेकॉर्ड दशावतार चित्रपटाने मोडला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
चित्रपटाने किती कमाई केली?
११ दिवस उलटून दशावतार या चित्रपटाने १६.६५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने दुसऱ्या रविवारी तब्बल ३ कोटींची कमाई केली आहे. सोमवार २२ नोव्हेंबर रोजी कमाईत थोडी घट झाली असून या दिवशी सिनेमाने ८० लाख रुपये कमावले आहेत. ११ व्या दिवशी 'दशावतार' ने मराठी थिएटरमध्ये एकूण 17.04 % प्रेक्षकसंख्या नोंदवली.
या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडली
दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, भरत जाधव, अभिनय बेर्डे, रवी काळे, विजय केंकरे, सुनील तावडे आणि आरती वडगबाळकर यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांचा अभिनय असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या चित्रपटातून एक महत्वाचा संदेश देण्यात आला आहे. प्रेक्षकांनी थ्रिलर आणि परंपरांचे मिश्रण पाहायला मिळाले आहेत.
दिलीप प्रभावळकर यांचा दमदार अभिनय
दिलीप प्रभावळकर यांचा या चित्रपटात दमदार अभिनय झाला आहे. त्यांनी परत एकदा सिनेमाच्या नायकाची नव्याने व्याख्या रचली आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी एक अभिनेता हिरो बनून बॉक्स ऑफिसवर गर्दी जमवण्यात आली आहे. या चित्रपटाने १६.६५ कोटी रुपयांच्या कमाईसह दशावतारने चांगल्या चांगल्या बॉलिवूड चित्रपटांना टक्कर दिली आहे.


