तमिळ सिनेसृष्टीतील अभिनेता डेनियल बालाजी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

| Published : Mar 30 2024, 10:56 AM IST / Updated: Mar 30 2024, 11:03 AM IST

daniel balaji

सार

तमिळ सिनेसृष्टीतील अभिनेते डेनियल बालाजी यांचे निधन झाले आहे. डेनियल बालाजी यांनी आपल्या करियरची सुरूवात कमल हसन यांचा सिनेमा 'मुधुनायगम' मध्ये युनिट प्रोडक्शन मॅनेरजरच्या रुपात केली होती.

Daniel Balaji Death : तमिळ सिनेसृष्टीतील अभिनेते डेनियल बालाजी यांचे शुक्रवारी (29 मार्च) चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. डेनियल यांच्या छातीत दुखण्यास सुरूवात झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 48 वर्षीय अभिनेत्याच्या निधनाने तमिळ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

कमल हसन यांच्या सिनेमापासून सिनेसृष्टीत काम करण्यास सुरूवात
डेनियल बालाजी यांनी आपल्या करियरची सुरूवात कमल हसन (Kamal Hasan) यांचा सिनेमा 'मुधुनायगम' मध्ये युनिट प्रोडक्शन मॅनेरजरच्या रुपात केली होती. यानंतर टेलिव्हिजनच्या माध्यमातून काम करण्यास सुरूवात केली. तेथे त्यांना डेनियल नावाची मुख्य भुमिका मिळाली होती. यामुळेच त्यांना डेनियल बालाजी असे नाव मिळाले.

अखेरचा सिनेमा वर्ष 2022 मध्ये केला होता
डेनियल बालाजी यांनी त्यांच्या करियरमधील अखेरचा सिनेमा वर्ष 2022 मध्ये केला होता. तमिळ सिनेमा 'एप्रिल मधाथिल' नावाच्या सिनेमात डेनियल यांनी काम केले होते. तमिळ सिनेमांव्यतिरिक्त त्यांनी मल्याळम, तेलुगु आणि कन्नड सिनेमांमध्येही काम केले होते.

आणखी वाचा : 

मेहनत आणि कामाच्या प्रति असलेल्या समर्पणातून त्याने स्वतःला सिद्ध केलं आता अनेक निर्माते आणि दिग्दर्शक फिरतात त्याचा मागे

40 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट ज्याला बनवायला 16 वर्षे लागली...वाचा सविस्तर

काय सांगताय अदिती राव हैदरी व सिद्धार्थ यांनी लग्न नाही तर साखरपुडा केला…