श्रीकृष्णाच्या प्रेमसरात बुडालेली राधा...पाहा Tamannaah Bhatia चे मनमोहक PHOTOS
- FB
- TW
- Linkdin
)
तमन्नाचे नवे फोटोशूट
अभिनेत्री तमन्ना भाटियाने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर काही सुंदर आणि मनोहक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तमन्नाच्या मागे श्रीकृष्ण दिसून येत आहे. खरंतर, जन्माष्टमीच्या ऐन मोक्यावर तमन्नाचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
तमन्नाचे राधेच्या रुपातील फोटोशूट
तमन्ना भाटियाने इंस्टाग्रामवर राधेच्या रुपातील काही फोटोशूट शेअर केले आहेत. यामध्ये तमन्नाने पेस्टल रंगातील आउटफिट्स परिधान केले आहे. यामध्ये तमन्नाचा लूक अतिशय सुंदर दिसतोय.
तू छेडू नको रे श्रीहरी
राधेला कृष्ण छेडत असल्याचा फोटो रिक्रिएट करण्यात आला आहे. यामध्ये राधेसोबत अन्य काही गवळणी देखील दिसतायत.
श्रीकृष्णाच्या प्रेमात बुडालेली राधा
श्रीकृष्णाच्या प्रेमात बुडालेल्या राधेचा मनमोहक अंदाज फोटोंमधून दिसून येत आहे. राधेवर अपार प्रेम करणाऱ्या श्रीकृष्ण आणि राधेची प्रेमलीला अपार असल्याचे म्हटले जाते.
तुझी राधा मी
तमन्ना भाटियाने तोरानी ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. राधा आणि कृष्णाच्या फोटोशूटच्या सीरिजला ‘लीला’ असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय राधा-कृष्णाचे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणारे काही व्हिडीओही शेअर करण्यात आले आहेत.
राधा ही बावरी हरीची
तमन्ना भाटियाच्या फोटोशूटचे कौतुक केले जात आहे. अनेक युजर्सने तमन्नाला तू राधेसारखी दिसतेय अशी कमेंट केली आहे.
आणखी वाचा :
Janmashtami 2024 : श्रीकृष्णाच्या आयुष्यावरील 6 सिनेमे, नक्की पाहा
मराठीतील हे 7 सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, पाहा लिस्ट