मराठीतील हे 7 सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, पाहा लिस्ट
Entertainment Aug 24 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
धर्मवीर-2
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील ‘धर्मवीर-2’ सिनेमा येत्या 27 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात प्रसाद ओकसह क्षितीज दाते असे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
Image credits: Instagram
Marathi
अहो विक्रमार्का!
‘अहो विक्रमार्का’ सिनेमा 30 ऑगस्टला तेलुगु, कन्नड, मराठी, हिंदी आणि तमिळ भाषेत रिलीज होणार आहे. या सिनेमात तेजस्विनी पंडीत, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे असे मराठीतील कलाकार झळकणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
रघु 350
लव्ह ट्रँगलवर आधारित असा ‘रघु 350’ सिनेमा येत्या 6 सप्टेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन आशिष मडके यांनी केले आहे.
Image credits: Instagram
Marathi
नवरा माझा नवसाचा-2
सचिन पिळगावर, अशोक सराफ अशी तगडी मराठीतील तगडी स्टारकास्ट असणारा नवरा माझा नवसाचा-2 सिनेमाची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. सिनेमा 20 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन
अजिंक्य उपासनी यांनी दिग्दर्शित केलेला 'श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन' सिनेमा 6 सप्टेंबरा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात गौरव उपासनी, सायली वैद्य असे कलाकार झळकणार आहेत.
Image credits: Instagram
Marathi
फौजी
नागेश भोसले, सौरभ गोखले आणि अश्विनी केसर यांचा 'फौजी' सिनेमा येत्या 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सिनेमाचे नाव आणि पोस्टरवरुनच सिनेमाची कथा काय असणार आहे हे कळतेय.
Image credits: Instagram
Marathi
नेता गीता
‘नेता गीता’ सिनेमा येत्या 30 ऑगस्टला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमात सुधांशू बुदुख आणि शिवानी बावकर असे कलाकार झळकणार आहेत.