फेअरप्ले ॲपवर बेकायदेशीरपणे आयपीएल मॅचेसचे स्ट्रीम केल्याप्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स

| Published : Apr 25 2024, 10:54 AM IST

Tamannaah Bhatia

सार

फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगचे बेकायदेशीरपणे स्ट्रीमिंग केल्या प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावला आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएलची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने ‘वायकॉम 18’ समुहाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) चे बेकायदेशीरपणे स्ट्रीमिंग केल्या प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावला आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएलची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने ‘वायकॉम 18’ समुहाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे वायकॉम समूहाने तक्रार दाखल केली होती. यावरून महाराष्ट्र सायबर सेलने तमन्नाला समन्स बजावला आहे. तिला चौकशीसाठी सायबर तपास अधिकाऱ्यांसमोर 29 एप्रिल रोजी हजर राहावं लागणार आहे. यामुळे तमन्नाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

या प्रकरणी संजय दत्तलाही समन्स :

फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगचे बेकायदेशीरपणे स्ट्रीमिंग केल्या प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावला आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएलची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने ‘वायकॉम 18’ समुहाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.याच प्रकरणात अभिनेता संजय दत्तलाही 23 एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्या तारखेला भारतात नसल्याने तो चौकशीसाठी हजर राहू शकला नाही. आपला जबाब नोंदवण्यासाठी त्याने सायबर सेलकडे आणखी वेळ मागितला आहे.

फेअरप्ले बेटिंग ॲप नेमकं आहे तरी काय?

फेअरप्ले हे एक बेटिंग एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे. ज्यावरून विविध प्रकारचे स्पोर्ट्स आणि एंटरटेन्मेंटशी संबंधित जुगार खेळला जातो. या ॲपच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, फेअरप्लेवर क्रिकेट हा सर्वाधिक आवडता खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटवर सर्वाधिक सट्टा लावला जातो. त्यानंतर फुटबॉल आणि टेनिस यांना लोकांची पसंती आहे. या सर्व खेळांचे सामने फेअरप्लेवर थेट प्रक्षेपित केले जातात, जेणेकरून ॲपवर खेळाडूला सट्टेबाजी करणाऱ्याला एकाच वेळी खेळही पाहता येईल आणि रक्कमही जिंकता येईल. अशी या अँपची संकल्पना आहे.