सार

‘ये काली काली आंखें’ फेम ताहिर राज भसीन नेटफ्लिक्सच्या आगामी रहस्यमय थ्रिलर वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. ही सिरीज सिद्धार्थ पी. मल्होत्रा आणि सपना मल्होत्रा यांच्या अल्केमी प्रॉडक्शन्स अंतर्गत तयार होत असून रेंसिल डिसिल्वा यांनी दिग्दर्शन केले आहे.

'ये काली काली आंखें' सीजन 2 मधील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा ताहिर राज भसीन लवकरच नेटफ्लिक्सच्या आगामी रहस्यमय थ्रिलरमध्ये झळकणार आहे.

या नवीन प्रोजेक्टबद्दल ताहिर म्हणतो, "माझ्यासाठी नेहमीच असे प्रोजेक्ट्स महत्त्वाचे असतात, जे काहीतरी हटके आणि नावीन्यपूर्ण देतात. ही थ्रिलर-मिस्ट्री वेब सिरीज अशा अनेक ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेली आहे, जी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल."

त्याने निर्माते आणि दिग्दर्शकांचे आभार मानत सांगितले, "सिद्धार्थ पी. मल्होत्रा आणि माझे दिग्दर्शक रेंसिल डिसिल्वा यांनी या जबरदस्त कथेसाठी मला योग्य समजले याचा मला आनंद आहे. मी त्यांच्या कामाचा नेहमीच चाहता राहिलो आहे आणि त्यांच्यासोबत काम करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. या सिरीजमध्ये इंडस्ट्रीतील काही नावाजलेले कलाकार पहिल्यांदाच एकत्र येत आहेत, त्यामुळे त्यांच्या सोबत काम करायला खूप उत्सुक आहे. मला खात्री आहे की आम्ही सेटवर उत्तम कलात्मक सहयोग करू आणि ही कथा उत्कृष्टरित्या साकार करू."

ताहिर पुढे म्हणाला, "नेटफ्लिक्सवर माझा मागील प्रोजेक्ट ‘ये काली काली आंखें’ प्रचंड हिट ठरला होता आणि याची स्वतःची खास चाहतावर्ग आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या या नवीन वेब सिरीजबद्दलही मोठ्या अपेक्षा असतील. मला खात्री आहे की ही भन्नाट रहस्यमय कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवेल."

ही सिरीज सिद्धार्थ पी. मल्होत्रा आणि सपना मल्होत्रा यांच्या अल्केमी प्रॉडक्शन्स अंतर्गत तयार होत आहे. ‘रंग दे बसंती’ आणि ‘उंगली’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक रेंसिल डिसिल्वा यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

नेटफ्लिक्सच्या या दमदार थ्रिलरमध्ये परिणीती चोप्रा आणि जेनिफर विंगेट यांच्यासह सोनी राजदान, हरलीन सेठी, अनुप सोनी, सुमीत व्यास आणि चैतन्य चौधरी यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.