Video : तापसी पन्नूच्या लग्नातला व्हिडीओ झाला व्हायरल, तापसीने डान्स करून गाठले लग्नाचे स्टेज

| Published : Apr 03 2024, 08:03 PM IST / Updated: Apr 03 2024, 08:45 PM IST

Taapsee Pannu Mathias Boe Wedding

सार

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने काही दिवसांपूर्वीच विवाह केला आहे. तापसीने तिचा प्रियकर मॅथियास बो याच्यासोबत उदयपूरमध्ये विवाह केला.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने काही दिवसांपूर्वीच विवाह केला आहे. तापसीने तिचा प्रियकर मॅथियास बो याच्यासोबत उदयपूरमध्ये विवाह केला. तिचा विवाह मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत झाला होता, त्यामुळे येथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून आला नाही. पण आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो सगळ्या फॅन्सला आवडत असल्याचे दिसत आहे. 

तापसी पन्नूचा व्हिडीओ - 
तापसी पन्नूचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसंद केले जात आहे. लग्नमंडपात जाताना तापसी पन्नू ही डान्स करताना जात आहे. ती नवरीच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. तिच्या लग्नाला कमी लोक उपस्थित होते. लाल रंगाचा ड्रेस, लाल रंगाच्या बांगड्या आणि काळ्या रंगाच्या गॉगलमध्ये अभिनेत्री खूपच स्टायलिश दिसत आहे.

View post on Instagram
 

तापसी पन्नूने कोठे केले लग्न? - 
तापसी पन्नू आणि मॅथियास बो या दोघांचा विवाह उदयपूरमध्ये झाला. या विवाहासाठी अतिशय मोजके पाहुणे उपस्थित होते. 20 ते 23 मार्च दरम्यान त्यांचा लग्नसोहळा सुरू होता. ते दोघेही दहा वर्षांपासून रिलेशिनशिपमध्ये होते. ते दोघेही 23 मार्च 2024 रोजी ते लग्नबंधनात अडकले. तापसीने लग्नानंतर कोठे राहायचा हा निर्णय अजूनही जाहीर केला नसून ते लवकरच समजेल. 
आणखी वाचा -
उद्धव ठाकरे गटाने लोकसभेसाठी दुसरी उमेदवार यादी केली जाहीर, महाविकास आघाडी काय घेणार निर्णय?
हम डरते नहीं डराने वालो को हम डराते है, बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेचे फुकले रणशिंग