हम डरते नहीं डराने वालो को हम डराते है, बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेचे फुकले रणशिंग

| Published : Apr 03 2024, 06:10 PM IST

बच्चू कडू

सार

अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येथून प्रहार पक्षाकडून उमेदवाराने अर्ज भरला आहे. प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येथून प्रहार पक्षाकडून उमेदवाराने अर्ज भरला आहे. प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्ष आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. 

बच्चू कडू यांनी बोलताना म्हटले आहे की, “हम डरते नहीं. डराने वालो को हम डराते है. तानाशाही नहीं चलेगी. उखाड के फेक देंगे. आमची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पण निवडणुकीच्या तोंडावर गडी ऐकायला तयार नव्हता. या निवडणुकीत राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. दिनेश बूब हा सच्चा रुग्णसेवक आहे. वर्षभर गोरगरीब लोकांना दिनेश बूब जेवण जेवू घालतात.” 

अमरावती येथून तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी, भाजप आणि प्रहार पक्षात खरी लढत होईल. बच्चू कडू यांना सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जाते. त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज होते. अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना तिकीट देऊ नका असे बच्चू कडू यांनी भाजप सरकारला म्हटले होते पण येथून अखेर त्यांनाच तिकीट देण्यात आले. 
आणखी वाचा - 
उद्धव ठाकरे गटाने लोकसभेसाठी दुसरी उमेदवार यादी केली जाहीर, महाविकास आघाडी काय घेणार निर्णय?
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट, 4.5 किलो वजन झाले कमी