Sonakshi Sinha-Zaheer Iqbal ची लग्नपत्रिका लीक, जाणून घ्या रिसेप्शन पार्टी ते आउटफिट थीमबद्दल सर्वकाही

| Published : Jun 13 2024, 12:23 PM IST

sonakshi sinha zaheer wedding couple confirm wedding in leaked audio marriage card

सार

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना लग्नपत्रिका लीक झाली आहे. खरंतर, लग्नपत्रिका ऑडिओ फॉर्मेटमध्ये आहे.

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding Card Leak : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल दोघेजण लग्नाच्या चर्चांमुळे सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. अशातच काही रिपोर्ट्समधून दावा करण्यात आलाय की, दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलेय. अन्य काही रिपोर्ट्स सांगतायत की, कपल येत्या 23 जूनला लग्न करणार आहेत. अशातच सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाची पत्रिका लीक झाली आहे. लग्नपत्रिका ऑडिओ फॉर्मेटमध्ये आहे. यामध्ये सोनाक्षीचा आाज येत असून दोघेजण आपल्या मित्रपरिवाराला आनंदाच्या क्षणात सहभागी होण्यास सांगत आहेत. जाणून घ्या सोनाक्षीच्या लग्नाबद्दलच्या प्रत्येक अपडेट्सबद्दल सर्वकाही सविस्तर...

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची खास लग्नपत्रिका
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाची पत्रिका अत्यंत खास आहे. खरंतर, ऑडिओ फॉर्मेटमध्ये असलेल्या लग्नपत्रिकेवरुनच कळतेच की, सर्वजण किती उत्सुक आहेत. याशिवाय एक खास मेसेजही लग्नपत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आता नवरा-बायकोच्या नात्यात अडकणार असल्याचेही कपल सांगत आहेत. यामुळे येत्या 23 जूनला हातातली कामे टाकून आमच्यासोबत पार्टी करण्यासाठी या असेही आवाहन लग्नपत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

कुठे असणार सेलिब्रेशन
रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या लग्नाची पार्टी शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरंट बास्टियनमध्ये असणार आहे. वेडिंग कार्डवर रात्री 8 वाजताची वेळ दिली आहे. ड्रेस कोड फॉर्म असावा आणि लाल रंगाचे कपडे परिधान करु नये असेही म्हटले आहे. कार्डवर हे देखील लिहिलेय की, अफवा खऱ्या होत्या.

रजिस्टर पद्धतीने लग्न करणार सोनाक्षी-जहीर? झूमला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या एका जवळच्या सूत्रांनी सांगितले की, दोघेजण रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहे. सूत्रांनी असेही म्हटले आहे की, 23 जूनला संध्याकाळी कपल एकत्रित सेलिब्रेशन करणार आहे. पण लग्नाबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही. कपलने आधीच रजिस्टर पद्धतीने लग्न केल्याचेही काहीजण म्हणतायत.

आणखी वाचा : 

एक चूक आणि 6 महिन्यांसाठी स्वत:ला विसरली होती Disha Patani

लग्नासाठी या अभिनेत्रींनी स्विकारला इस्लाम धर्म, दुसरे नाव करेल हैराण