सार
भारताचे तरुण हे देशाचे सर्वांत मोठे बळ आहेत. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनाला ही स्फूर्तिदायक आणि ऊर्जावान पिढी पुढे नेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या भविष्यासाठी तरुणांनी अधिक सक्रिय भूमिका बजावावी, या आवाहनाला अनुसरून युवा कार्य मंत्रालयाने राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पुनर्रचनेद्वारे 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' मध्ये रूपांतर केले आहे. या परिवर्तनशील उपक्रमाद्वारे भारतातील तरुणांची सामूहिक क्षमता उपयोगात आणण्यावर आणि त्यांना देशाच्या विकासामध्ये सर्वंकष योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर भर दिला जात आहे.
‘विकसित भारत @2047’ या उपक्रमामध्ये भारताने स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजे 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या व्यापक आराखड्यात सर्वसमावेशक विकास, शाश्वत प्रगती आणि प्रभावी प्रशासनाला महत्त्व आहे. या अभियानाच्या केंद्रस्थानी तरुण आहेत, जे या बदलाचे मुख्य प्रेरक मानले जातात.
बॉलीवूडमधील उदयोन्मुख अभिनेत्री शर्वरी, जिने 2024 मध्ये मुंजा आणि ‘महाराज’ या दोन हिट चित्रपटांद्वारे लोकप्रियता मिळवली आहे, तिने या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे. देशातील तरुणांनी राष्ट्र उभारणीत भाग घ्यावा, असे तिने आवाहन केले आहे.
शर्वरी म्हणाली, “आपले तरुण देशासाठी राष्ट्र उभारणीसाठी आपले विचार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि काही जगातील मोठ्या आयकॉनसमोर मांडू शकतात, हे जाणून प्रचंड प्रेरणा मिळते. ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’चा भाग होण्याचा मला खूप आनंद आहे. भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवण्यासाठी तुमचे विचार शेअर करण्यासाठी मी सर्वांना आमंत्रित करते!”
तिने पुढे सांगितले, “आपण एक तरुण देश आहोत, आपल्याला मोठ्या महत्वाकांक्षा आणि स्वप्ने आहेत. पण आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्या मातृभूमीला बळकटी देण्यासाठी सहभागी व्हावे लागेल. आपल्या नेत्यांसोबत संवाद साधून आपले विचार मांडणे गरजेचे आहे. प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे.”