सार

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी ही स्प्राईटची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असेल. तिचे सहजसोपे आणि मोहक व्यक्तिमत्त्व स्प्राईटच्या फ्रेश आणि कूल अटिट्यूडशी जुळते. स्प्राईटच्या 'थंड रख' मोहिमेचे नेतृत्व ती करेल.

स्प्राईट इंडियाने अधिकृत घोषणा केली आहे की बॉलिवूडची नवी आणि दमदार अभिनेत्री शर्वरी आता त्यांच्या ब्रँडची नवी ब्रँड अॅम्बेसेडर असेल! आपल्या सहजसोप्या आणि मोहक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाणारी शर्वरी स्प्राईटच्या फ्रेश, यंग आणि कूल अटिट्यूडची परिपूर्ण प्रतिमा आहे.

अतिशय प्रतिभावान अशी शर्वरी ही आपल्या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानली जाते. 100 कोटींचा ब्लॉकबस्टर ‘मुंज्या’, जागतिक स्तरावर हिट ठरलेला ‘महाराज’, आणि दमदार अॅक्शन-थ्रिलर ‘वेदा’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आधीच आपली ओळख निर्माण केली आहे. आणि आता स्प्राईटच्या ‘स्प्राईट, थंड रख ’ या नवीन मोहिमेसाठी तिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आले आहे.

स्प्राईट हा ब्रँड नेहमीच आपल्या फ्रेश आणि विनोदी संवादशैलीद्वारे ग्राहकांशी कनेक्ट होत आला आहे. त्यामुळेच या पिढीतील सर्वाधिक कनेक्ट होणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या शर्वरीला या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी निवडण्यात आले आहे. या नवीन कॅम्पेनच्या माध्यमातून स्प्राईट ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत कूल राहण्याचा संदेश देत आहे!