बॉलीवूड अभिनेत्री शर्वरीने अल्बर्टा फेर्रेत्तीच्या रिसॉर्ट २०२४ कलेक्शनमधील एक दुर्मिळ गाऊन परिधान केला. मायक्रो आणि मॅक्रो सिक्विन एम्ब्रॉयडरीने नटलेला हा कॉलम बस्टियर गाऊन तिच्यासाठी आर्काइव्हमधून आणण्यात आला होता.

बॉलीवूडची ‘रायझिंग स्टार’ म्हणून ओळखली जाणारी शर्वरी केवळ आपल्या दमदार अभिनयानेच नव्हे, तर तिच्या फॅशन सेन्सनेही प्रेक्षकांची मने जिंकते. अलीकडेच तिने अल्बर्टा फेर्रेत्तीच्या रिसॉर्ट 2024 कलेक्शनमधील एक दुर्मिळ गाऊन घालून सगळ्यांचे लक्ष वेधले. खास तिच्यासाठी आर्काइव्हमधून आणलेला हा अप्रतिम कॉलम बस्टियर गाऊन, मायक्रो आणि मॅक्रो सिक्विन एम्ब्रॉयडरी च्या सुरेख डिझाइनने नटलेला आहे.

View post on Instagram

अशा दुर्मिळ आऊटफिट मध्ये झळकणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये शर्वरीचं नाव घेतलं जातं. तिच्या सहजसुंदर शैलीला पूरक असलेल्या या ब्लिंग इफेक्टमुळे ती अगदी लूकचा शोस्टॉपर ठरली. अल्बर्टा फेर्रेत्तीच्या डिझाइनचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रीसौंदर्य आणि त्याच्या विविध छटांचा गौरव करणे. शर्वरीने हा गाऊन परिधान करताच तो फक्त एक पोशाख न राहता तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अभिव्यक्तीचा एक भाग बनला!