सार

लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल लागला असून मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते आणि कलाकार मंडळी आपले मत मांडताना दिसत आहे.

एंटरटेनमेंट डेस्क : 'लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल लागला असून मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते आणि कलाकार मंडळी आपले मत मांडताना दिसत आहे. अशातच आता मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट खूप चर्चेत आहे. निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर शरद पोंक्षे यांनी आपली पोस्ट शेअर केली आहे.

शरद पोंक्षे यांची पोस्ट नेमकी काय ?

शरद पोंक्षे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आपले स्पष्ट मत मांडले आहे. त्यांनी याबाबत कोणत्याही राजकीय नेत्याचा उल्लेख न करता नागरिकांना उद्देशून ती पोस्ट केली आहे. पण पोस्टवरच्या कमेंट्सवरुनच ती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असल्याचं स्पष्ट होत आहे. पोंक्षे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, स्वा सावरकरांचं वाक्य पुन्हा खरं ठरलं,मला मुस्लिमांची, ख्रिश्चनांची भिती वाटत नाही. मला हिंदूंची भिती वाटते. कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात उभे ठाकतात. असं त्यांनी पोस्ट मध्ये मत मांडलं आहे. यावरून ते या निकालाबाबत नाराज झाले असल्याचे दिसत आहेत.

महाराष्ट्रातील लोकसभेचा धक्कादायक निकाल :

महाराष्ट्रातील लोकसभेचा निकाल धक्कादायक लागला आहे. अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला आहे. यामध्ये जालन्याचे रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रात मविआने महायुतीची चांगलीच दमछाक केलीय. महाराष्ट्रात मविआने 30 जागांवर मुसंडी मारत विजय मिळवला आहे. तर महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाच्या जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर दिल्याचं बघायला मिळत आहे. 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदा राज्यात काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे.

आणखी वाचा :

Rajneeti चित्रपटादरम्यान कतरिना कैफने अचानक मनोज बाजपेयीच्या पायाला स्पर्श केला होता? वाचा सविस्तर काय आहे तो किस्सा…