- Home
- Entertainment
- Coolie, War 2 Box Office Collection Day 5 : 'कुली' ठरला 5 दिवसांत चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!
Coolie, War 2 Box Office Collection Day 5 : 'कुली' ठरला 5 दिवसांत चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!
मुंबई - रजनीकांतचा 'कुली' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत २०२५ मधील भारतातील चौथी सर्वाधिक कमाई करणारी भारतीय फिल्म बनली आहे. फक्त ५ दिवसांत त्याने हा पराक्रम केला आहे. तर त्याचसोबत प्रदर्शित झालेला 'वॉर २' सध्या टॉप ५ मध्येही नाही.

'कुली'ची गेल्या दोन दिवसांची कमाई (Coolie Day 5 Box Office Collection)
लोकेश कनगराज दिग्दर्शित तमिळ चित्रपट 'कुली'ने पाचव्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी सुमारे ९.३६ कोटी रुपयांची कमाई केली. चौथ्या दिवशी (रविवार) च्या तुलनेत चित्रपटाच्या कमाईत सुमारे ७३.४ टक्क्यांची घसरण झाली आहे. रविवारी या चित्रपटाने ३५.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती.
'कुली'ची पाच दिवसांची कमाई (Coolie 5 Days Collection)
'कुली'ने ५ दिवसांत सुमारे २०३.८६ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या ते पाचव्या दिवसापर्यंत अनुक्रमे ६५ कोटी रुपये, ५४.७५ कोटी रुपये, ३९.५ कोटी रुपये, ३५.२५ कोटी रुपये आणि ९.३६ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
2025 मधिल सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट (Top 5 Highest Grossing Indian Movies Of 2025)
२०२५ मधील पाच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर छावा, दुसऱ्या क्रमांकावर सैयारा, तिसऱ्या क्रमांकावर महावतार नरसिम्हा, चौथ्या क्रमांकावर कुली आणि पाचव्या क्रमांकावर संक्रांतिकी वस्तुनाम आहे. या चित्रपटांची कमाई अनुक्रमे ६०१.५७ कोटी रुपये, ३२४.४ कोटी रुपये, २१०.५ कोटी रुपये, २०३.८६ कोटी रुपये आणि १८६.९७ कोटी रुपये आहे.
'वॉर 2' ची गेल्या दोन दिवसांची कमाई (War 2 Day 5 Collection)
अयान मुखर्जी दिग्दर्शित स्पाय अॅक्शन ड्रामा 'वॉर' ने पाचव्या दिवशी म्हणजेच प्रदर्शनानंतर पहिल्या सोमवारी ७.५२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. चौथ्या दिवशी (रविवार) च्या तुलनेत या चित्रपटाच्या कमाईत सुमारे ७६.६ टक्क्यांची घसरण झाली. रविवारी चित्रपटाने ३२.१५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.
'वॉर 2' चे पाच दिवसांचे कलेक्शन (War 5 Days Collection)
'वॉर २' ने ५ दिवसांत एकूण सुमारे १८२.२७ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. चित्रपटाने पहिल्या ते पाचव्या दिवसापर्यंत अनुक्रमे ५२ कोटी रुपये, ५७.३५ कोटी रुपये, ३३.२५ कोटी रुपये, ३२.१५ कोटी रुपये आणि ७.४२ कोटी रुपयांची कमाई केली. 'वॉर २' हा २०२५ मधील ७ वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. टॉप ५ आम्ही वर सांगितले आहेत. या यादीत सहाव्या स्थानावर 'हाउसफुल ५' आहे, ज्याने १८३.३८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
