वयाच्या 73 व्या वर्षीही धमाकेदार ऍक्शन मुव्ही, रजनीकांतच्या 'कुली 171'चा टीझर पाहिला का ?

| Published : Apr 23 2024, 03:46 PM IST

Rajinikanth Movie Coolie

सार

रजनीकांत यांच्या "कुली थलाईवर 171" चित्रपटचा टायटल टीझर रिलीज झाला आहे. रजनीकांत यांनी वयाच्या 73 व्या वर्षीही आपली बरोबरी नसल्याचे दाखवून दिले आहे. लोकेश कनगराजच्या या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता निर्माण केली आहे.

वय 73 वर्षे तरीही माझ्याशी कोणी बरोबरी करू शकत नाही हे या तीन मिनिटाच्या टायटल टिझर मधून रजनीकांत ने संपूर्ण सिनेसृष्टीला दाखवून दिले. धमाकेदार एंट्री आणि ऍक्शन चित्रपटासह पुन्हा एकदा रजनीकांत कुली चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. मागील दिवांगी ऐसी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर थलाईवर कुली चित्रपटातून प्रेक्षांच्या भेटीला येत आहेत. या टायटल टीझरमध्ये रजनीकांत आपल्या शत्रूंना लोखंडी नव्हे तर घड्याळापासून बनवलेल्या सोन्याच्या साखळीने मारत आहे. या शीर्षकाच्या टीझरमध्ये त्याचा ॲक्शन अवतार पाहायला मिळत आहे. प्रत्येक दृश्यात त्याची जादू कायम आहे. रजनीकांतच्या कुलीचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे.लोकेश कनगराजचा मागील चित्रपट विक्रम आणि लिओ हा सुपरहिट ठरला होता. कुलीचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांचे आहे.मात्र या चित्रपटातील उर्वरित स्टारकास्टचा खुलासा अद्याप झालेला नाही.

YouTube video player

काय टायटल टिझरमध्ये ?

कुली हा रजनीकांतचा ॲक्शन चित्रपट आहे या टीझरमध्ये असे दिसून येते की, काही लोक सोन्याचे तस्कर आहेत आणि त्यांना समजले की त्यांच्या जागी कोणीतरी नको असलेली व्यक्ती आली आहे. अशाप्रकारे, ती व्यक्ती दुसरी कोणी नसून रजनीकांत आहे आणि तो त्यांना छठीच्या दुधाची आठवण करून देत आहे. रजनीकांत त्यांच्या ओळखीच्या शैलीत पाहायला मिळाला आहे. तो पूर्ण स्टाईल आणि स्वॅगसह ॲक्शन करताना दिसतो आणि शेवटी त्याचा कुली बॅज देखील दाखवतो. अशा प्रकारे रजनीकांतने आपली भूमिका या चित्रपट दाखवली आहे.

कुली 171 चा टायटल टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस :

होय लाडक्या रजनीकांतचे कूलीमधील ऍक्शन सीन पासून चाहत्यांना त्याचा हा अंदाज पसंतीस पडला आहे. एवढ्या काही वेळातच टायटल टीझरच्या व्हिडिओने ४ मिलिअनच्या टप्पा गाठला होता. तसेच त्या व्हिडिओवर हजारो कंमेंट्स देखील चाहत्यांनी पोस्ट केल्या आहेत.