सार
मागच्या तीन दिवसांपासून संपूर्ण भारतात एकाच मुद्दा गाजत आहे तो म्हणजे पुण्यातील हिट अँड रण केस.यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रया उमटल्या आहेत.यावर आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या युट्युब चॅनेल वर व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
मागच्या तीन दिवसांपासून संपूर्ण भारतात एकाच मुद्दा गाजत आहे तो म्हणजे पुण्यातील हिट अँड रण केस. यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रया उमटल्या आहेत. यावर आता कायम वेगवेगळ्या मुद्द्यामुळे चर्चेत असलेल्या मराठी अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या युट्युब चॅनेल वर व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात एका पोर्शे गाडीनं दोघांना चिरडले. ती पोर्शे गाडी एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. ही घटना कल्याणीनगर येथे रविवारी (ता. १९) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात आयटी अभियंता तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता. या अपघातामुळे देशभरात खळबळ उडाली. सध्या या अपघातावरून संपूर्ण देशात घमासान सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कोणी सरकारवर ताशेरे ओढताय तर कोणी बाल हक्क न्याय मंडळावर. अशातच आता अभिनेत्री केतकी चितळेनं या घटनेबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. केतकी चितळेन या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.
व्हिडिओमध्ये केतकी काय म्हणाली ?
केतकीनं तिच्या इन्स्टाग्रामवर दोन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये म्हणते, "ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्या अल्पवयीन मुलाची काही चूक नव्हती, असा पोलिसांचा प्लॅन होता, पण पोलिसांचा हा प्लॅन फसला. पोलीस महानालायक असतात हे आपल्याला माहित आहे."असं म्हणत तिने थेट पुणे पोलिसांवर संताप व्यक्त करत ताशेरे ओढले आहे.
तसेच केतकीने तिच्या लेट्स टॉक या युट्यूब चॅनलवर देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ जवळजवळ २४ मिनिटांचा आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून केतकीन पुण्यातील अपघाताबाबत तिचं मत व्यक्त केले. यामध्ये ती म्हणाली, "जे लोक या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करायला गेले होते, त्यांनाच पोलिसांनी अरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं, ही गोष्ट नवीन नाहीये. माझ्यावर ही तर डायरेक्ट डेथ थ्रेट देण्यात येत होते.यासाठी मी पोलिसांना मदतीचा हात मागायला गेले तेव्हा मला धक्कादायक अनुभव पोलिसांकडून मिळाला आहे. त्यामुळे पोलीस महानालायक असतातच यात काही वेगळं नाही. यासह तिने तिला आलेला अनुभव देखील शेअर केला. तेव्हा कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये मी गेले होते, ही केतकी तुच कशी? असे प्रश्न मला पोलिसांनी तेव्हा विचारले होते."
आणखी वाचा :
Munjya: 'मुंज्या'च्या ट्रेलरच्या तारीख आली समोर, निर्मात्यांनी शेअर केले चित्रपटाचे आणखी एक पोस्टर
किरण राव आणि आमिरला यांच्या दबावामुळे करावे लागले लग्न, म्हणाली- आम्ही एक वर्ष डेट केले…