- Home
- Entertainment
- Priya Marathe Dies : प्रिया मराठेची शेवटची सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल, शंतनूसोबत दिसली रोमॅन्टीक केमेस्ट्री
Priya Marathe Dies : प्रिया मराठेची शेवटची सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल, शंतनूसोबत दिसली रोमॅन्टीक केमेस्ट्री
मराठीसह हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत निधन झालं. रविवारी पहाटे चार वाजता प्रियाने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे.

शेवटची सोशल मीडिया पोस्ट
आजारीपणामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रिया सोशल मीडियापासून दूर होती. तिची शेवटची पोस्ट 11 ऑगस्ट 2024 रोजीची आहे. यात तिने नवरा शंतनू मोघेसोबत जयपूरमधील पिकनिकचे फोटो शेअर केले होते. आमेर किल्ल्यावर घेतलेले सुंदर फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिलं होतं – “किल्ल्याची विशालता आणि त्यातील गुंतागुंत पाहून थक्क झालो…”
या फोटोंमध्ये प्रिया आणि शंतनू निवांत क्षणांचा आनंद घेताना दिसत होते.
Priya Marathe Passed Away : सुबोध भावेने शेअर केली भावनिक पोस्ट, तिच्यासोबत होते विशेष नाते
वैयक्तिक आयुष्य
23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यात जन्मलेल्या प्रियाने 2012 मध्ये अभिनेते शंतनू मोघे याच्याशी विवाह केला. दोघांची जोडी मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय होती. त्यांच्या सहजीवनातील क्षण नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरले.
प्रिया मराठेचं करिअर
प्रिया मराठे यांनी ‘या सुखांनो या’ मालिकेतून मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर हिंदी मालिकेत पाऊल ठेवत ‘कसम से’ आणि ‘पवित्र रिश्ता’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या.
अभिनयाची छाप सोडली
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. याशिवाय ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘साथ निभाना साथिया’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा मराठी-हिंदी मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली.
कलाक्षेत्रात शोककळा
प्रियाच्या अकाली जाण्यामुळे मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सहकलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. प्रेक्षकांना नेहमीच आपल्या सहजसुंदर अभिनयाने मोहवणारी प्रिया आज नाही, हे वास्तव अनेकांना पटवून देणं कठीण ठरत आहे.
प्रिया मराठेचे काही फोटो
.
प्रिया मराठेचे काही फोटो
.
प्रिया मराठेचे काही फोटो
.
प्रिया मराठेचे काही फोटो
.