- Home
- Entertainment
- Priya Marathe Passed Away : सुबोध भावेने शेअर केली भावनिक पोस्ट, तिच्यासोबत होते विशेष नाते
Priya Marathe Passed Away : सुबोध भावेने शेअर केली भावनिक पोस्ट, तिच्यासोबत होते विशेष नाते
मुंबई : मराठी तसेच हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं शनिवारी पहाटे मुंबईत निधन झालं. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती.

सुबोध भावेची भावनिक आठवण
प्रियाच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावर मन हेलावून टाकणारी पोस्ट लिहिली. त्याने नमूद केलं “प्रिया माझी चुलत बहीण, एक उत्तम अभिनेत्री आणि लढवय्या स्त्री होती. कॅन्सरशी ती धैर्याने लढली. काही वर्षांपूर्वी उपचारानंतर पुन्हा रंगभूमीवर परतली. प्रत्येक भूमिका समरस होऊन तिने साकारली. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेदरम्यान पुन्हा तिचा त्रास वाढला, तरी तिने हार मानली नाही. या प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे कायम खंबीरपणे तिच्या सोबत होता. पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. जिथे असशील तिथे शांतता लाभो. ओम शांती.”
अभिनयाचा प्रवास
प्रिया मराठे हिने मराठी मालिकांपासून अभिनय कारकीर्द सुरू केली. ‘या सुखांनो या’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या मराठी मालिकांसोबतच तिने हिंदी प्रेक्षकांनाही ‘पवित्र रिश्ता’, ‘कसम से’, ‘साथ निभाना साथिया’, ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकांतून मंत्रमुग्ध केलं. तिच्या सहजसुंदर आणि मनापासून केलेल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या घराघरात ती पोहोचली.
मनोरंजनविश्वात हळहळ
प्रिया मराठेच्या निधनाने सहकलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. कॅन्सरवर मात करून पुन्हा काम सुरू केलेली ही अभिनेत्री खऱ्या अर्थाने लढवय्या होती. पण नियतीने तिला वेळ न दिल्याने कलाक्षेत्रात एक प्रतिभावान चेहरा हरपला आहे.
प्रिया मराठेचे काही फोटो
या फोटोत ती घराच्या गच्चीवर दिसत आहे.
प्रिया मराठेचे काही फोटो
समुद्राच्या शेजारी बसून त्याकडे बघता प्रिया मराठे.
प्रिया मराठेचे काही फोटो
विदेशातील रेल्वे स्टेशनवर प्रिया मराठे.
प्रिया मराठेचे काही फोटो
विदेश दौर्यात प्रियाचा एक हटके अंदाज.
प्रिया मराठेचे काही फोटो
पंजाबी सुटमध्ये प्रिया मराठे.
प्रिया मराठेचे काही फोटो
स्टायलिश जिन्समध्ये प्रिया मराठे.
प्रिया मराठेचे काही फोटो
नवरा शंतनूसोबत प्रिया मराठे.
प्रिया मराठेचे काही फोटो
सुंदर साडीत प्रिया मराठे.

