- Home
- Entertainment
- Priya Marathe dies : ठाण्याची प्रिया मराठे, अंधेरीत पडली प्रेमात, अशी होती शंतनूसोबतची लव्हस्टोरी
Priya Marathe dies : ठाण्याची प्रिया मराठे, अंधेरीत पडली प्रेमात, अशी होती शंतनूसोबतची लव्हस्टोरी
मराठी रंगभूमीपासून ते हिंदी मालिकांपर्यंत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. तिच्या जाण्याने मराठीसह हिंदी मनोरंजन क्षेत्रावर दुःखाचं सावट पसरलं आहे.

प्रिया मूळची ठाण्याची. करिअरच्या सुरुवातीला ती शुटिंगच्या निमित्ताने अंधेरीत राहत होती. तिची रुममेट शर्वरी लोहकरे हिच्या माध्यमातून प्रियाची भेट अभिनेता शंतनू मोघे याच्याशी झाली. शर्वरी आणि शंतनू ‘आई’ या मालिकेत एकत्र काम करत होते. मालिकेच्या शेवटच्या दिवसांत झालेल्या एका पार्टीत प्रिया-शंतनूला एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्या रात्रीनंतर दोघांच्या नात्याची नवी सुरुवात झाली.
हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. एका दिवसात शंतनूने थेट प्रियाला लग्नाची मागणी घातली आणि तिनेही तत्काळ होकार दिला. सुरुवातीला घरच्यांना या नात्याची कल्पना नव्हती, मात्र एका पुरस्कार सोहळ्यात शंतनूने सर्वांसमोर प्रियाचं नाव घेतल्याने गोष्ट दोन्ही कुटुंबांपर्यंत पोहोचली.
यानंतर ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू आणि प्रिया यांचा विवाह २४ एप्रिल २०१२ रोजी थाटामाटात पार पडला. साध्या पण गोड लव्हस्टोरीने आयुष्याला नवा रंग दिला होता.
मात्र, नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. प्रियाच्या अकाली जाण्याने शंतनू मोघे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनय जगतातील अनेक सहकारी कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली असून तिच्या जाण्याने मराठी-हिंदी कलाक्षेत्रातील एक उमदा चेहरा हरपला आहे.
वयाच्या अवघा ३८ व्या वर्षी तिचे कॅन्सरने निधन झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. तिने पवित्र रिश्तासह अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

