सार

द फॅमिली मॅन सीझन 3: प्राइम व्हिडिओने अलीकडेच पंचायत सीझन 3 ची घोषणा केली आहे. या महीन्यात सिझन ३ येत असून आता "द फॅमिली मॅन सीझन 3" चे शूटिंग देखील सुरू झाले आहे. पुन्हा एकदा श्रीकांत तिवारी पुनरागमन करणार आहे.

प्राइम व्हिडिओने अलीकडेच पंचायत सीझन 3 च्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. 'पंचायत 3' 28 मे पासून प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. दरम्यान, Amazon Prime Video ने आपल्या दर्शकांसाठी आणखी एक मोठी बातमी सांगितली आहे. प्राइम व्हिडिओने आपल्या लोकप्रिय वेब सीरिज द फॅमिली मॅन सीझन 3 चे शूटिंग सुरू केले आहे. मनोज बाजपेयीची ही मालिका चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय असून आता पुन्हा एकदा ही मालिका नव्या पात्रांसह दार ठोठावणार आहे.राज आणि डीकेची मालिका त्यांच्या D2R फिल्म्सने बनवली आहे. सीझन 2 संपल्यापासून,चाहत्यांमध्ये सीझन ३ ची उत्सुकता होती.त्यांच्या साठी ही आनंदाची बातमी आहे.

View post on Instagram
 

या सीझनमध्येही मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीची भूमिका साकारणार आहे, जो एक मध्यमवर्गीय माणूस असून एक गुप्तहेर आहे. आगामी सीझनमध्ये, श्रीकांतला कौटुंबिक जीवनाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना पाहणार असून त्याच बरोबर राष्ट्रीय सुरक्षेसाठी कठीण धोक्याचा सामना करताना पाहायला मिळणार आहे.तसेच पत्नीसोबतचे नाते सुधारण्यासाठी तो खूप प्रयत्न करतानाही दिसणार आहे.तसेच या सीझनमध्ये श्रीकांत आणखीन मोठ्या दहशतवाद विरोधी संघटनेशी सामना करताना दिसणार आहे. यामध्ये त्याला आणखीनच कठीण परिस्थितीतून जावे लागणार आहे. याचबरोबर घरातील गोष्टी देखील तो सांभाळताना दिसणार आहे.

या कलाकारांचा समावेश :

सुमन कुमार, राज आणि डीके लिखित, राज आणि डीके निर्मित, बहुप्रतिक्षित तिसऱ्या सीझनमध्ये मनोज बाजपेयी (श्रीकांत तिवारी), प्रियमणी (सुचित्रा तिवारी), शरीब हाश्मी (जेके तळपदे), अश्लेशा ठाकूर यांच्यासह अनेक मूळ कलाकारांचे पुनरागमन होणार आहे. (धृती तिवारी), वेदांत सिन्हा (अथर्व तिवारी) यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच नवीन कलाकार देखील या सीझनमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.