कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या मानहानी प्रकरणाचा मध्यस्थीद्वारे निपटारा केला आहे. कंगनाने इंस्टाग्रामवर कोर्टातील दोघांचा फोटो शेअर करत ही माहिती दिली.
छावा सिनेमामुळे विकी कौशल सध्या चर्चेत आहे. अशातच नुकत्याच एका कार्यक्रमात विकी कौशलने आशा भोसलेंच्या पाया पडला तर राज ठाकरेंना मिठी मारल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकी कौशलच्या अशा वागण्याचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.
आयुष्मान खुराना यांनी 'दम लगा के हैशा' चित्रपटाच्या १० वर्षांच्या वाटचालीनिमित्त त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. त्यांनी त्यांच्या 'तरुण स्वतःला' उद्देशून एक भावनिक पत्र लिहिले, त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीची त्यांची चिंता, घबराट व्यक्त केली.
अभिषेक बॅनर्जी, शहाणा गोस्वामी, नीरज काबी यांचा 'महासंगम' हा चित्रपट नुकत्याच संपलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हा चित्रपट एका वडिलांच्या, मुलाच्या आणि मुलीच्या संगीताच्या वारशाच्या संघर्षाची कथा सांगतो.
ऑस्कर २०२५ पुरस्कार सोहळा रविवारी, ३ मार्च रोजी हॉलीवूड, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. भारतातील प्रेक्षक हा सोहळा स्टार मूव्हीज आणि जिओहॉटस्टारवर सकाळी ५:३० वाजल्यापासून लाइव्ह पाहू शकतात.
प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी 'नागिनी' हे त्यांचे नवीन गाणे लाँच केले आहे. ते म्हणाले की ही एक मालिकेची सुरुवात असून, 'नागिनी' हे त्यातील पहिले गाणे आहे. हे गाणे पूर्णपणे मनोरंजनात्मक आहे.