सार

आजच्या भागात दोघांचा साखरपुडा पार पडताना पाहायला मिळणार आहे. भटजी विधिवत पद्धतीने दोघांना एकमेकांच्या बोटात अंगठी घालायला सांगणार असून, यानंतर कुटुंबाचा आशीर्वाद घ्यायला सांगणार आहेत.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना लीला आणि अभिराम यांचा साखरपुडा झालेला पाहायला मिळणार आहे.अभिराम ने लीलाला दिलेली अंतराची अंगठी पुन्हा एकदा सापडल्यामुळे आता लीलाला अभिरामशी साखरपुडा करावाच लागणार आहे. अंतराची अंगठी शोधण्यासाठी आजी देवाकडे साकडे घातले आणि अखेर आजीने अंगठी शोधूनच काढली . आता अंतराची अंगठी मिळाल्यानंतर अभिराम देखील साखरपुड्यासाठी तयार झाला होतो आणि लीलाच्या घरच्यांनी आणलेला कुर्ता घालून खाली येतो. आजच्या भागात दोघांचा साखरपुडा पार पडताना पाहायला मिळणार आहे. भटजी विधिवत पद्धतीने दोघांना एकमेकांच्या बोटात अंगठी घालायला सांगणार असून, यानंतर कुटुंबाचा आशीर्वाद घ्यायला सांगणार आहेत.

 

View post on Instagram
 

एकीकडे साखरपुडा होत असताना त्याठिकाणी साळुंके येतो आणि होत असलेला सगळं प्रकार पाहतो. यावर साळुंके काय करणार याकडे प्रेक्षकांच्या नजर लागून आहेत.कालिंदीने आपल्याला फसवलं, लीलाच तुझ्याशी लग्न लावणार सांगून तिने एजेशी लीलाचा साखरपुडा करून दिला, हे लक्षात आल्यानंतर आता साळुंके भलताच चिडणार आहे. रागाने त्याच्या हातातील काचेचा ग्लास खाली पडून फुटणार आहे. आता तो कालिंदीकडून बदला कसा घेता येईल, याचा विचार करत तिथून निघून जाणार आहे. दुसरीकडे, कालिंदी घरी आल्यानंतर सगळ्यांसमोर आपल्या जावयाचा मोठेपणा सांगणार आहे. त्याचवेळी लीला आणि कालिंदी यांच्यासोबतच तिथे दुर्गाची एन्ट्री होणार आहे.

दुर्गा करणार लीलशी मिळवणी :

आपल्याला लीलाशी काहीतरी खाजगीत बोलायचंय, असं म्हणत दुर्गा लीलाला तिथून घेऊन जाणार आहे. घरात आतमध्ये गेल्यावर दुर्गा लीलाच्या हातात गुलाबांच्या फुलांचा गुच्छ देत तिला शुभेच्छा देणार आहे. मात्र, त्या फुलांना हात लावताच लीलाच्या हाताला काटे टोचणार आहेत. ज्याप्रमाणे या सुंदर फुलांना काटे आहेत, त्याचप्रमाणे तू अभिरामच्या आयुष्यात आल्यावर मी तुझं आयुष्य असंच उद्ध्वस्त करणार असल्याची धमकी दुर्गा लीलाला देणार आहे. तर, ‘मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मुळात या साखरपुड्यामागे माझा काही उद्देशच नाही. मला माझ्या मनाविरुद्ध हा साखरपुडा करावा लागतोय’, असं म्हणत लीला दुर्गावर चिडणार आहे.