सार

शिवांगी जोशी आणि कुशल टंडनचा किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे दिसते.

कुशल टंडन आणि शिवांगी जोशी हे दोघेही टीव्ही जगतातील प्रसिद्ध कलाकार आहेत. या दोघांनी अनेक टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. कुशल टंडन 39 वर्षांचा आहे, तर शिवांगी आता 26 वर्षांची आहे. दोघांमध्ये 13 वर्षांचा फरक आहे. दोघांची लव्ह केमिस्ट्री सतत चर्चेत असते. आता शिवांगी जोशी आणि कुशल टंडनच्या डेटिंगच्या बातम्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर येत आहेत. अशा परिस्थितीत दोघांचा किस करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

View post on Instagram
 

व्हायरल व्हिडिओ मध्ये काय ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ त्यांच्या थायलंड व्हेकेशनचा आहे. ज्यामध्ये कुशल अभिनेत्री शिवांगीला किस करताना दिसत आहे. व्हायरल क्लिपमध्ये कुशल शिवांगीला तिच्या गालावर किस करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या आधारे हे दोन्ही कलाकार खरोखरच प्रेमसंबंधात आहेत का. असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

कुशल आणि शिवांगीच्या डेटिंग बातम्या :

शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज त्यांच्या चाहत्यांनी लावला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिवांगी आणि कुशल 'बरसातें'च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तेव्हापासून ते एकत्र आहेत. दोन्ही स्टार्स या नात्याबद्दल खूप गंभीर आहेत. हे दोघेही लवकरच एंगेजमेंट होण्याची शक्यता आहे.मात्र, काही दिवसांपूर्वी कुशलने त्यांच्या डेटिंगच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या आणि त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्राम स्टोरीवर यासंबंधीची पोस्ट शेअर केली होती. त्याने लिहिले होते, मिडीया मित्रा. माझी एंगेजमेंट होत आहे, हे आम्हाला माहीत नाही का? मी थायलंडमध्ये मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत आहे.