कमल हसन यांच्या 3 बिग बजेट तामिळ चित्रपटांचे जाणून घ्या अपडेट...

| Published : Mar 26 2024, 07:25 PM IST / Updated: Mar 26 2024, 07:26 PM IST

198959728-kamal-hasan830x450-43513.jpg

सार

कमल हसन नुकतेच 3 तामिलचित्रपट येणार असल्याचे भाष्य केले आहे. दिग्दर्शक शंकरच्या इंडियन 2 आणि इंडियन 2 बद्दल अपडेट त्यांनी शेअर केलं आहे. मणिरत्नमच्या ठग लाइफचे शूटिंग पुन्हा केव्हा सुरू करणार होणार याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

 

एंटरटेनमेंट डेस्क : साऊथ चित्रपट सृष्टीतून सद्य अनेक रोमांचक चित्रपट येत आहेत. वेगळ्या धाटणीच्या चित्रपट असल्याने लोकप्रियता मिळत आहे. अश्यातच एक मोठं अपडेट साऊथ मधून येत आहे. साऊथ चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी आगामी चित्रपटांबद्दल भाष्य केले आहे. इंडियन 2 आणि इंडियन 2 तसेच ठग लाईफ हे तीन तामिळ चित्रपटाबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. यासह त्याने कल्की 2898 बद्दल अपडेट दिले.नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कमल हसन यांनी या चित्रपटांची स्थिती आणि ते कधी प्रदर्शित होणार याबद्दल सांगितले आहे.

ते म्हणले की, दिग्दर्शक शंकर यांचा इंडियन 2 हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. सध्या हा चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. कमल हासन हे विक्रम या चित्रपटात दिसले होते. तो पडद्यावर येऊन एक वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. त्यांचा चाहता वर्ग मोठा असल्याने पुन्हा एका मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली जात असताना हे अपडेट त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे.

विक्रम चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला:

2022 मध्ये, कमल हसन यांनी लोकेश कानागराजच्या विक्रममध्ये काम केले होते. हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ठ चित्रपट ठरला होता. विक्रम चित्रपटानंतर ते दिग्दर्शक शंकरच्या इंडियन २ या चित्रपटाचे शूटिंग केले. नुकतेच एका मुलाखतीत त्यांच्या आगामी चित्रपटांचे अपडेट मोकळेपणाने शेअर केले आहे. ते म्हणाले की, त्याच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाला थोडा विलंब होत आहे. त्यांनी सांगितले की इंडियन 2 आणि इंडियन 3 चे शूटिंग पूर्ण झाले आहे. इंडियन 2 चे पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. हे पूर्ण केल्यानंतर,आम्ही इंडियन 3 च्या पोस्ट-प्रॉडक्शनवर काम सुरू करू.

तसेच ठग लाईफ या चित्रपटा बद्दल विचारले असता ते म्हणाले की,मणिरत्नमच्या ठग लाइफचे शूटिंग निवडणूक प्रचार संपल्यानंतर लगेच सुरू होणार आहे. तसेच कल्कि 2898 मध्ये देखील कार्यरत आहे. या चित्रपटात त्याची छोटीशी भूमिका असणार आहे. प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 600 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन आहेत.हा चित्रपट 6 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा :

शाहरुख खान सिनेमात तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार होता, या कारणास्तव झाली एक्झिट

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लुकची चर्चा, जिंकली चाहत्यांची मन

होळी सणाला कुत्र्यांवर होणाऱ्या अत्याचारावर अभिनेत्री श्रद्धा कपूर संतप्त, दोषींच्या विरोधात कार्यवाही करण्याची केली मागणी